लाच घेताना लिपीक जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 01:12 AM2018-03-16T01:12:14+5:302018-03-16T01:12:14+5:30
मुदत संपलेल्या परवाना नुतनिकरणासाठी हजार रुपयांची लाच घेताना लाखांदूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा लिपीक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाईत अडकला. ही कारवाई गुरुवारला दुपारी बाजार समितीच्या कार्यालयात करण्यात आली.
ऑनलाईन लोकमत
भंडारा : मुदत संपलेल्या परवाना नुतनिकरणासाठी हजार रुपयांची लाच घेताना लाखांदूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा लिपीक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाईत अडकला. ही कारवाई गुरुवारला दुपारी बाजार समितीच्या कार्यालयात करण्यात आली.
नितीन नत्थुजी रामटेके (४१) असे लाच घेणाऱ्या लिपिकाचे नाव आहे. लाखांदूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सन २०१४-१५ मध्ये तक्रारदाराने (परवाना क्रमांक १६८५) अधिकृत परवाना प्राप्त केला होता. या परवान्याची मुदत संपत आल्यामुळे तक्रारदाराला परवाना नुतनी करणासाठी लाखांदूर कृषी उत्पन्न बाजार समितीने नोटीस बजावली होती. त्याअनुषांने तक्रारदाराने बाजार समितीमध्ये संबंधित लिपीक रामटेके यांना धान्य खरेदी-विक्रीचा परवाना नुतनीकरणाबाबद विचारले असता. रामटेके यांनी तक्रारदाराला दिड हजार रुपये दिल्याशिवाय परवाना नुतनीकरण करुन देणार नाही असे म्हटले. परंतु तक्रारदाराला पैसे द्यायचे नव्हते. त्यामुळे त्यांनी यासंदर्भात भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. त्यानुसार गुरुवारला दुपारी सापडा रचला यावेळी हजार रुपयांची लाच घेताना लिपीक रामटेके याला रंगेहाथ पकडण्यात आले.
ही कारवाई उपअधिक्षक दिनकर सावरकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी, गणेश पदवाड, संजय कुरंजेकर, गौतम राऊत, सचिन हलमारे, अश्विन गोस्वामी, पराग राऊत, कोमल बनकर, शेखर देशकर, दिनेश धार्मिक आदीनीं केले.