नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन राशी केव्हा मिळणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:29 AM2021-01-14T04:29:22+5:302021-01-14T04:29:22+5:30
शासनाने घोषणा केली; परंतु दोन लाखांवरील कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी अजूनपर्यंत झाली नाही. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी न ...
शासनाने घोषणा केली; परंतु दोन लाखांवरील कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी अजूनपर्यंत झाली नाही. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने ५० हजार प्रोत्साहनपर राशी देण्याची घोषणा केली होती; परंतु अजूनपर्यंत या घोषणेची अंमलबजावणी झाली नाही. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांवर हा अन्याय आहे. शासनाने येथे तत्काळ दखल घ्यावी, अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपुरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. सध्या रब्बीचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे शेतकर्याकडे पैसा नाही. नियमित कर्जफेड केल्याने शेतकर्यांनी शासनाला मदतच केली; परंतु कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक तंगीचा सामना करावा लागत आहे. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन नियमित कर्ज पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे.