‘त्यांच्या’ आयुष्यात अच्छे दिन केव्हा येणार!
By admin | Published: December 24, 2014 10:55 PM2014-12-24T22:55:49+5:302014-12-24T22:55:49+5:30
भंडारा जिल्ह्यात थोड्या प्रमाणात विखुरलेला असला शेती उपयोगी औजारे तयार करणारा लोहार समाज आजही विकासापासून वंचित आहे. यंत्राद्वारे शेतकी अवजारे तयार होत असल्याने
लोहार व्यवसाय दुष्काळाच्या छायेत
चिचाळ : भंडारा जिल्ह्यात थोड्या प्रमाणात विखुरलेला असला शेती उपयोगी औजारे तयार करणारा लोहार समाज आजही विकासापासून वंचित आहे. यंत्राद्वारे शेतकी अवजारे तयार होत असल्याने लोहान समाजाच्या व्यवसायावर दुष्काळी परिस्थितीची गडद छाया पसरलेली आहे.
'लोहार' या नावानुसार लोह म्हणजे लोखंड आणि लोखंडाच्या विविध वस्तु बनविणारा लोहार आज शासनाच्या उदासीन धोरणामुळे दयनीय अवस्था भोगित आहे. जिल्ह्यात या समाजाचे लोक झाडाच्या सावलीत किंवा तलावालगत दुकाने मांडून कामे करताना आढळतात. लहानशा घरात किंवा गवताच्या झोपडीत कुटूंबियासोबत उदरनिर्वाह करीत असतात.
प्राचीन काळात लोहार ही उच्च जात समजली जायची शेतकऱ्यांच्या कृषि विषयक कामासाठी लागणारे औजारे, बंडीची चाके, लाकडी, नांगराचा फार वखराची फास, धान्य कटाई करिता लागणारा विळा इत्यादी शेती उपयोगी साधने तयार करून लोहार पोठ भरतीत असे. पुर्वीच्या राजेशाही अस्तित्वात युद्धाची हत्यारे बनविणारा मुख्य कारागीर हा लोहारच असल्यामुळे त्याला राजश्रय प्राप्त होता.
आता यंत्राद्वारे होणारे लोखंडी वस्तूचे उत्पादन ज्यात मुख्यत्वे शेतीचे औजारे तसेच घरगुती वापरण्याच्या वस्तू दर्जेदार व कमी खर्चीत उत्पादीत होत असल्यामुळे जिल्ह्यातील बळीराजा शेती हंगामाचे औजारे यंत्राद्वारे तयार करीत आहेत. परिणामी मृग नक्षत्रापासून लोहार समाजातील कारागीराची उपासमार होत आहे. त्यामुळे परंपरागत लोहारी कामाचा हळूहळू ऱ्हास होत गेला. सध्या लोहाराला भरपूर काम मिळणे दुरापस्त झाले आहे. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती खालावत गेली आणि आज तो अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहे.
लोहार समाज आधिच अशिक्षित अडाणी, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक राजकीय क्षेत्रात अंध:कारमय जीवन जगणाऱ्या लोहार समाजाचे राजकीय पुढाऱ्याने समस्या उचलून न धरल्याने लोहार व गाडी लोहार समाज संघटने मार्फत समाजातील काही बुद्धीजीव, समाज कर्तव्यदक्ष समाज बांधवांनी पुढाकार घेवून लोहार व पोटजाती गाडी लोहार, घिसाडी लोहार, चितोडी लोहार, कोकणी लोहार, राजपूत लोहार, खाती, खातवाडी लोहार कन्नड लोहार, परदेशी लोहार, हिन्दू लोहार व मराठा लोहार यांना भटक्या जातीमध्ये समाविष्ठ करून १५ जाती पैकी कोणत्याही जातीची नोंद आली तरी लोहार या एकच भटक्या जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे म्हणून संघटनेमार्फत मोर्चे, अधिवेशने, धरणे, आंदोलनाची दखल घेत शासनाने दि.१ मार्च २००६ रोजी लोहार समाजाला भटक्या जमाती (ब) मध्ये समाविष्ठ केले.
मात्र जिल्ह्यातील बऱ्याच तहसील कार्यालयात शासनाचे आदेश येवूनही समाजातील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देताना लोहार, गाडी लोहार, घिसाडी लोहार, चितोडी लोहार, कोकणी लोहार, राजपूत लोहार, खाती, खातवाडी लोहार, कन्नड लोहार आदी या सर्व एकच जात असतानाही मात्र तहसील कार्यालयातून विनाकारण त्रास देत असल्याचे लोहार समाज पवनी तालुका उपाध्यक्ष सुनिल सुर्यवंशी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. (वार्ताहर)