अतिवृष्टीने पडलेल्या घरांची नुकसानभरपाई केव्हा मिळणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:17 AM2021-01-24T04:17:20+5:302021-01-24T04:17:20+5:30
तुमसर तालुक्यातील नदीकाठावरील गावात महापूर आला होता. वैनगंगा व बावनथडी नदीचे पाणी गावात शिरले होते. गावातील अनेक घरांना त्याच्या ...
तुमसर तालुक्यातील नदीकाठावरील गावात महापूर आला होता. वैनगंगा व बावनथडी नदीचे पाणी गावात शिरले होते. गावातील अनेक घरांना त्याच्या फटका बसला होता. काहींचे घर भुईसपाट झाले होते तर, काही नागरिकांच्या घरांची पडझड झाली होती. महसूल प्रशासनाने मोका पंचनामा केला. हा संपूर्ण अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला. परंतु अजूनपर्यंत शासनातर्फे कोणतीही नुकसानभरपाई मिळाली नाही. काहींना भाड्याच्या घरात राहावे लागत असून, काही नागरिक पडक्या घरातच वास्तव्य करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. एक ते दीड महिन्यात नुकसानभरपाई मिळेल, असे भाषण शासनाने दिले होते. काही लोकप्रतिनिधींनीसुद्धा गावात जाऊन पूरग्रस्तांच्या भेटी घेतल्या होत्या. घरे पडलेल्यांना आश्वासन दिले होते, परंतु ते आश्वासन हवेतच विरले असे दिसत आहे.
दुसरीकडे मोहाडी तालुक्यातील घरे पडलेल्या नागरिकांना नुकसानभरपाईची रक्कम मिळाली. परंतु तुमसर तालुक्यातील नागरिकांना अजूनही नुकसानभरपाई मिळालेली नाही. शासन आणि प्रशासनाने तात्काळ नुकसानग्रस्त नागरिकांना नुकसानभरपाई देण्याची मागणी के. के. पंचबुद्धे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे