कारधा निलज राज्यमार्ग केव्हा पूर्ण होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:24 AM2021-06-20T04:24:08+5:302021-06-20T04:24:08+5:30
बॉक्स नेरला गावानंतर जंगल असल्याने तिथे सिमेंट काँक्रीटचे काम करता येत नाही. कंपनीच्या कामावर अनेक ठिकाणी प्रश्नचिन्ह ...
बॉक्स
नेरला गावानंतर जंगल असल्याने तिथे सिमेंट काँक्रीटचे काम करता येत नाही. कंपनीच्या कामावर अनेक ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज्यमार्ग तयार होऊन एक वर्ष होताच अनेक ठिकाणी सिमेंट काँक्रीटच्या रोड बांधकामास भेगा पडलेल्या आहेत. राज्यमार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे यावरून दिसत आहे. या कामावर देखरेख ठेवण्याचे कार्य राज्य व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे अधिकारी पाहतात; पण तेही कामाच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष करीत आहेत. यावरून अधिकारी व कंपनी कंत्राटदार यांच्यामध्ये मोठी साठघाट असल्याचे दिसते. कामाकरिता वापरण्यात आलेली रेतीही पूर्णतः अवैध रेती उत्खननातून मिळवली आहे. या सर्व प्रकरणाची काही लोकप्रतिनिधींनी तक्रार केली; परंतु त्या तक्रारीकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. हा राज्यमार्ग केव्हा पूर्ण होईल, असे नागरिक विचारत आहेत. कंपनीचे अधिकारी शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करतात. कोंढा ते अड्याळ या गावादरम्यान मार्गाचे रुंदीकरण काम झाले; पण शेतकऱ्यांना शेतीमध्ये जाण्यासाठी रस्ते तयार करून दिलेले नाहीत. कंपनीने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.