कोंढा सोमनाळा रस्त्याचे काम केव्हा करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:37 AM2021-08-26T04:37:32+5:302021-08-26T04:37:32+5:30

कोंढा - कोसरा : कोंढा ते सोमनाळा रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला आहे. या रस्त्यावर असलेले डांबरीकरण उघडली आहे. तसेच ...

When will Kondha Somnala do road work? | कोंढा सोमनाळा रस्त्याचे काम केव्हा करणार?

कोंढा सोमनाळा रस्त्याचे काम केव्हा करणार?

Next

कोंढा - कोसरा : कोंढा ते सोमनाळा रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला आहे. या रस्त्यावर असलेले डांबरीकरण उघडली आहे. तसेच रस्ता उखडल्याने वाहतूक करणे धोकादायक झाले आहे. कोंढा परिसरात रस्त्याची दुर्दशा झाली आहे. पण सध्या या समस्याकडे लक्ष द्यायला कोणीही तयार नाही.

कोंढा ते सोमनाळा हा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत मंजूर झाला आहे. परंतु गेल्या दीड वर्षांपासून या रस्त्याचे काम सुरू झाले नाही. मेनरोड कोंढा येथील प्रवेशद्वारापासून ते सोमनाळा पर्यंत या मार्गाचे काम करण्यात येणार आहे. यासाठी आशिया बँकेची मदत मिळणार आहे. कोंढा तलावाजवळ दोन्ही बाजूंना लोखंडी कठाडे उभारण्यात येणार आहे.

तलावाच्या सौंदर्यीकरणात भर पडणार आहे.या कामासाठी कोंढा येथील सरपंच डॉ. नूतन कुर्झेकर यांनी प्रयत्न केले, पण रस्त्याचे काम अजून सुरू झालेले नाही.या रस्त्याने चालताना मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे मोटारसायकल व चारचाकी वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पिंपळगाव व सोमनाळा येथील विद्यार्थी दररोज या मार्गाने कोंढा येते शिक्षणासाठी येत असतात. त्यांना देखील रस्ता उखडल्याने मोठा त्रास सहन करावा लागत आहे. डांबरीकरण पूर्णपणे उखडले असून ठिकाणे मोठमोठे खड्डे पडले आहे. तेव्हा या रस्ता बांधकामाकडे प्रशासनाने लक्ष देऊन काम सुरू करण्याची मागणी दोन्ही गावच्या नागरिकांनी केली आहे.

250821\img_20210425_154613.jpg

फोटो

Web Title: When will Kondha Somnala do road work?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.