सालेबर्डीवासीयांना भूखंड केव्हा मिळणार?
By admin | Published: February 3, 2015 10:51 PM2015-02-03T22:51:20+5:302015-02-03T22:51:20+5:30
तालुक्यातील सालेबर्डी पांधी गाव गोसेखुर्द प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येते. येथील घर १०० टक्के पूर्णत: बाधित तर शेती ८० ते ९० टक्के बाधीत आहे. गावठाणाचा मोबदला रक्कम सप्टेंबर
भंडारा : तालुक्यातील सालेबर्डी पांधी गाव गोसेखुर्द प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येते. येथील घर १०० टक्के पूर्णत: बाधित तर शेती ८० ते ९० टक्के बाधीत आहे. गावठाणाचा मोबदला रक्कम सप्टेंबर २००९ मध्ये तर शेतजमिनीचा मोबदला आॅगस्ट २०११ ला देण्यात आला. परंतु पाच वर्षांपासून गावाला भुखंड मिळण्याची प्रतीक्षा सालेबर्डी पांधीवासी करीत आहे. अजून किती वर्ष भूखंड मिळण्याची प्रतीक्षा करावी लागेल, अशी प्रकल्पग्रस्त प्रशासन व लोकप्रतिनिधीकडे करीत आहेत.
सालेबर्डी पांधी या गावाचे चौथ्यांदा पुनर्वसन होत आहे. वारंवार पुनर्वसनामुळे गावकरी मेटाकुटीला आले आहेत. भूखंड मिळावे यासाठी गावकऱ्यांनी अनेक निवेदने देवून प्रशासनाकडे मागणी केली. पण प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे आहे. सदर गावचे पुनर्वसन शहापूर मारेगावजवळील मनोहरभाई पटेल नॉलेज सिटीजवळ करण्याचे नियोजित आहे. याठिकाणी अजूनपर्यंत पक्के रस्ते, विहिरी, नाल्या, विद्युत खांब इत्यादी प्राथमिक नागरी सुविधा शिल्लक असून पाच वर्षा कालावधी होऊनही भूखंडाचा पत्ता नाही, यामुळे गावकऱ्यांमध्ये असंतोष आहे. बाधित घरे झालेले अतिवृष्टीने मोडकळीस आले आहेत. अनेक कुटुंब जीव घेऊन पुनर्वसनाची वाट बघत आहेत.