सेंद्रीवासीयांना मुबलक पिण्याचे पाणी केव्हा मिळणार ?

By admin | Published: January 31, 2015 12:38 AM2015-01-31T00:38:51+5:302015-01-31T00:38:51+5:30

ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने सेंद्री खुर्द गावातील जनतेला पिण्याचे पाणी मुबलक मिळावे, यासाठी २२ लाख रूपये किंमतीची योजना मंजूर केली.

When will the sandstone drink abundant drinking water? | सेंद्रीवासीयांना मुबलक पिण्याचे पाणी केव्हा मिळणार ?

सेंद्रीवासीयांना मुबलक पिण्याचे पाणी केव्हा मिळणार ?

Next

चरणदास बावणे  कोंढा
ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने सेंद्री खुर्द गावातील जनतेला पिण्याचे पाणी मुबलक मिळावे, यासाठी २२ लाख रूपये किंमतीची योजना मंजूर केली. गेल्या चार वर्षापासून योजनेचे काम पूर्ण झाले नाही. तसेच पाण्याच्या टाकीची उंची १२ मीटर ऐवजी ९ मिटर केल्याने आतापासूनच सेंद्री टोली येथील जनतेला नळाद्वारे पाणी मिळत नाही. तेव्हा लाखो रूपये खर्च करून ही योजना पांढराहत्ती तर ठरणार नाही, अशी शंका गावकरी व्यक्त करीत आहेत. संबंधित विभागाने आधीच याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
ग्रामीण भागात लहान, मोठ्या गावात पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी पाणीपुरवठा विभाग योजना तयार करून ते पूर्ण करते. सेंद्रीखुर्द येथे चार वर्षापुर्वी पाणी पुरवठा योजना मंजूर केली. मुख्य विहीर, पाण्याची टाकी, पंपमशिन, पाईपलाईन असे कामे योजनेत निर्धारित होते.
काम कंत्राटदारामार्फत करण्यात येत आहे. पाण्याची टाकी उंच भागावर व १२ मीटर उंचीवर करणे आवश्यक होते. पण ९ मीटर उंचीवर व खालच्या भागावर ३० हजार लीटर पाणी क्षमतेची टाकी बांधकाम केले. तसेच टाकीचे बांधकाम खोलगट ठिकाणी केले.
सेंद्रीटोली येथील घरे उंचावर आहेत. त्यामुळे आतापासून टोलीवर टाकीचे पाणी चढत नाही म्हणून पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. मुख्य विहिर, पाईपलाईनचे काम पूर्ण झाले असून फक्त पंपींग मशनरीचे काम बाकी आहे.
गावात पिण्याच्या पाण्याची समस्या टोली येथे आहे. येथील नळांना पाणी येत नाही. अनेकांनी आपले नळ ५ ते ८ फुटपर्यंत खोल खड्डा तयार करून नळ बसविले तरी देखिल नळांना पाणी येत नाही. या योजनेद्वारे गावात सर्वत्र नवीन पाईपलाईन टाकली असून देखील नळाला पाणी येत नही. म्हणजे ही योजना पूर्णत: अपयशी ठरली आहे. सेंद्रीखुर्द गावात ४ हॅन्डपंप व ४ विहिरी आहेत. पण नागरिक नळाचे पाणी घेत असतात.
सेंद्रीटोली येथे ३ बोरवेलपैकी एक बोरवेलला पाणी येते म्हणून सर्व सेंद्रीटोली येथील नागरिकांना आतापासून पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवत आहे.
गावात लाखो रूपये खर्च करून योजनेद्वारे पिण्याचे पाणी मिळत नसेल त्याचा उपयोग काय, असा अनेक गावकरी प्रश्न विचारीत आहेत. पिण्याच्या पाण्याची टाकी खोलगट भागात व ९ मीटर उंच केल्याने ही समस्या उद्भवली आहे.
लाखो रूपये खर्च होवून पूर्ण गावाला पाणी मिळाले पाहिजे तेव्हाच ग्रामपंचायही योजना आपल्या ताब्यात होईल, असे सरपंच चंदा विजय सुखदेवे यांचे म्हणणे आहे. चार वर्षापासून पाणीपुरवठा योजनेचे काम चालू आहे. संबंधित विभागाचे अभियंता यांनी देखिल कामाकडे दुर्लक्ष केले.
उंच जागेवर आणि १२ मीटर उंच पाण्याची टाकी बांधकाम केले असते तर पाण्याची समस्या निर्माण झाली नसती असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. तरी पाण्याच्या टाकीची उंची वाढविण्याची मागण करीत लवकर काम पूर्ण करून जनतेच्या सेवेत पाणी पुरवठा देण्याची मागणी नाना उपरीकर, पुरूषोत्तम गिरडकर, नामदेव बनकर, शरद मोहरकर, गिरीधर सावरकर व गावकऱ्यांनी केली आहे.

Web Title: When will the sandstone drink abundant drinking water?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.