विरलीतील पाणी समस्या सुटणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 09:48 PM2018-06-02T21:48:34+5:302018-06-02T21:48:45+5:30

मागील दोन अडीच महिन्यांपासून येथील पाणी पुरवठा योजनेला अनेक संकटांनी घेरले आहे आणि ही संकटे दूर करण्यात स्थानिक प्रशासनाला अपयश येत असल्यामुळे गावकऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे विरलीतील ही पाणी समस्या सुटणार तरी कधी, असा संतप्त सवाल गावकऱ्यांनी केला आहे.

When will the water problem be discarded? | विरलीतील पाणी समस्या सुटणार कधी?

विरलीतील पाणी समस्या सुटणार कधी?

Next
ठळक मुद्दे६६ लाखांची योजना कुचकामी : पाणी पुरवठा योजनेचे ग्रहण सुटता सुटेना

हरिश्चंद्र कोरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
विरली (बु.) : मागील दोन अडीच महिन्यांपासून येथील पाणी पुरवठा योजनेला अनेक संकटांनी घेरले आहे आणि ही संकटे दूर करण्यात स्थानिक प्रशासनाला अपयश येत असल्यामुळे गावकऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे विरलीतील ही पाणी समस्या सुटणार तरी कधी, असा संतप्त सवाल गावकऱ्यांनी केला आहे.
सुमारे ३००० लोकवस्तीच्या या गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी ईटान येथील वैनगंगा नदीवर ६६ लाख रुपये खर्च करून वाढीव पाणीपुरवठा योजना उभारण्यात आली. यासाठी गावात पाच सार्वजनिक नळकोंडाळे आणि सुमारे ४५० खासगी नळजोडण्या कार्यरत आहेत. मात्र या पाणीपुरवठा योजनेची सदोष पाणी वितरण प्रणाली, स्थानिक प्रशासनाकडून टिल्लू पंपधारकांना मिळत असलेले अभय आणि पाणी पुरवठा योजनेत वारंवार येत असलेल्या बिघाडांमुळे गावकºयांना गेल्या अडीच महिन्यांपासून दिवसातून केवळ एकदाच अपुरा पाणी पुरवठा केला जातो. परिणामी गावकºयांवर भर उन्हातान्हात गावाशेजारील शेतामधून बैलबंडी, ट्रॅक्टर, सायकल आदी साधनांनी पाणी आणण्याची पाळी आली आहे.
गावात १५ हातपंप असून त्यापैकी १० कार्यरत आहेत. या हातपंपावरही रात्री बेरात्री पाणी भरणाºया महिलांची गर्दी आढळून येत असून पाण्यासाठी महिलांची आपआपसात भांडणे होत आहेत. या पाणी समस्येमुळे काही कुटुंबावर आपल्या बायको मुलांसह पाणी भरण्याची पाळी आली आहे. गावातील पाणी समस्येने एवढे गंभीर स्वरुप धारण केले असताना स्थानिक प्रशासनाला या पाणी पुरवठा योजनेतील बिघाड कायम स्वरुपी दूर करण्यात अपयश येत आहे.
गावात सुमारे शंभरावर टिल्लूपंप धारक असून त्यात काही ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील प्रतिष्ठीत नागरिकांचा समावेश आहे. या टिल्लूपंप धारकांवर कारवाई होणे अत्यावश्यक आहे. मात्र स्थानिक प्रशासन या टिल्लू पंपधारकांना पाठीशी घालत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. नळधारकांना पाणी मिळत नसल्यामुळे ते आपल्या नळ कनेक्शनजवळ खड्डा खोदून विना परवानगीने मुख्य पाईपलाईनवर सोयीस्कर ठिकाणी नळजोडणी करून पाणी मिळविण्यासाठी खटाटोप करीत आहेत. या नळधारकांवर ग्रामप्रशासनाचा अंकुश नसल्याचे निदर्शनास येत आहे.
सध्या या पाणी पुरवठा योजनेला अनेक समस्यांनी ग्रासले असून कधी मोटारची वायरिंग जळते, कधी व्हॉल्व निकामी होणे या सारख्या समस्या नित्याच्याच झालेल्या आहेत. सध्या गावात रोजगार हमीची कामे सुरु असून शेतकºयांची खरीप हंगामाच्या पूर्वतयारीची शेतीकामे सुरु आहेत. अशा या कामांच्या धावपळीत वेळी अवेळी होत असलेल्या पाणी पुरवठ्यामुळे गावकऱ्यांची तारांबळ उडत आहे.
जलवर्षातच जलसंकटाची नामुष्की
विरली बु. ग्रामपंचायतच्या वतीने सन २०१८ हे ग्राम जलवर्ष म्हणून साजरे केले जात आहे. त्यानिमित्त पाणी माझे जीवन अभिमान, मोठा गाजावाजा करून राबविण्याचा संकल्प करण्यात आला. यासाठी गावात घरोघरी दिनदर्शिकेच्या माध्यमातून प्रसार व प्रचार करण्यात आला. मात्र या अभियानानिमित्त राबविण्यात येणाºया योजनांची अंमलबजावणी प्रत्यक्षात उतरविण्यात ग्रामप्रशासनाला अपयश आले. परिणामी जलवर्षातच गावकऱ्यांवर जलसंकटाचा सामना करण्याची नामुष्की ओढवली.

Web Title: When will the water problem be discarded?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.