‘आम्हाला रोजगार केव्हा मिळणार’ गावागावांत झळकले फलक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 06:00 AM2019-11-20T06:00:00+5:302019-11-20T06:00:44+5:30

दयाल भोवते। लोकमत न्यूज नेटवर्क लाखांदूर : सण असो की उत्सव, नेत्याचा वाढदिवस असो की गावपुढाऱ्याकडील कार्यक्रम गावातील चौकात ...

'When will we get employment'? | ‘आम्हाला रोजगार केव्हा मिळणार’ गावागावांत झळकले फलक

‘आम्हाला रोजगार केव्हा मिळणार’ गावागावांत झळकले फलक

Next
ठळक मुद्देआगळीवेगळी शक्कल : बॅनरच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्याचा भारतीय युवा बेराजगार संघटनेचा प्रयत्न

दयाल भोवते।
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : सण असो की उत्सव, नेत्याचा वाढदिवस असो की गावपुढाऱ्याकडील कार्यक्रम गावातील चौकात फलक लावण्याची स्पर्धा दिसून येते. प्रत्येक गावातील चौक अशा फलकांनी ‘सजलेले’ दिसतात. मात्र लाखांदूर तालुक्यातील गावागावांतील चौकात लागलेले फलक आता सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ‘आम्हाला रोजगार केव्हा मिळणार’ असे शिर्षक असलेले आणि बेरोजगार तरुणांचे छायाचित्र असलेले फलक सध्या चर्चेचा विषय झाले आहे. भारतीय युवा बेरोजगार संघटनेच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्याची ही शक्कल लढविण्यात आली आहे.
शहरी असो की ग्रामीण भागात बेरोजगारीची समस्या अलीकडे मोठ्या प्रमाणात तरुणांना भेडसावीत आहे. उच्च शिक्षण घेवून आणि स्पर्धा परीक्षांचा तासन्तास अभ्यास करुनही नोकरी लागत नाही. शासन मेघाभरतीचे आश्वासन देवून तरुणांची दिशाभूल करीत आहे. नोकरी नसल्याने अनेक तरुण बेरोजगारीची जीने जगत आहे. बेरोजगारीबाबत प्रत्येकजण शासनाच्या नावाने संताप व्यक्त करीत आहे. मात्र नोकऱ्याच मिळत नाही.
आता या बेरोजगार तरुणांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अभिनव शक्कल लढविली आहे. गावागावातील चौकांमध्ये फलक लावून आम्हाला रोजगार केव्हा मिळणार असा सवाल विचारला आहे. भारतीय युवा बेरोजगार संघटनेच्या माध्यमातून लावलेले हे फलक आता सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. गत काही वर्षात बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. युवकांमध्ये निराशा निर्माण झाली आहे. शासनाच्या या नाकर्तेपणावर बोट ठेवत फलक लावून तरुणांनी वेगळे आंदोलनच उभारल्याचे दिसत आहे.
भारतीय युवा बेरोजगार संस्थेचे अध्यक्ष बालु चुन्ने यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले सर्वत्र बेरोजगारी दिसत आहे. बेरोजगारीमुळे तरुणांचे लग्नही जुळत नाही. उच्च शिक्षण घेतल्याने शेतीत काम करायलाही कुणी पुढे येत नाही. आई-वडीलांचे स्वप्न पुर्ण होत नसल्याने तरुण निराशेत जात आहेत. अशा तरुणांच्या भावनेला वाचा फोडण्यासाठी आपण पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले. लाखांदूर तालुक्यातील खोलमारा, दिघोरी, विरली बुज. यासह विविध गावात दर्शनी भागात लावलेले फलक तरुणांच्या व्यथा मांडत आहेत.

शासनाच्या उदासीन धोरणाचा निषेध
लाखांदूर तालुक्यातील तरुणांनी गावागावांत फलक लावून रोजगाराबाबत शासनाचा उदासीन धोरणाचा एकप्रकारे निषेधच केला आहे. बेरोजगारांना रोजगार आणि नोकऱ्या देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. परंतु गत पाच वर्षात तरुणांना नोकºया मिळाल्या नाही. उलट खाजगी आस्थापनातून मंदीच्या नावाखाली त्यांना घरचा रस्ता दाखविण्यात आला. मेगा भरतीतूनही बेरोजगारांच्या हाती काही लागले नाही. शहरी आणि ग्रामीण भागात बेरोजगारांची विदारक परिस्थिती आहे. अशा तरुणांनी आता फलकांच्या माध्यमातून आपल्या मनातील खदखद मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सरकार आम्हाला नोकरी कधी देणार असा सवाल करीत भारतीय युवा बेरोजगार संस्थेच्या माध्यमातून लाखांदूर तालुक्यातील तरुण एकत्र येत शासनाचा धोरणाचा निषेध करीत आहेत.

Web Title: 'When will we get employment'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.