पवनीत नळ योजनेच्या पाईपलाईनचे काम केव्हा होणार

By admin | Published: June 10, 2017 12:19 AM2017-06-10T00:19:39+5:302017-06-10T00:19:39+5:30

पवनीकरांना समप्रमाणात पाणी पुरवठा होत नाही तो दूर करण्यासाठी पालिका प्रशासनाने प्रेशर पाईपलाईनची योजना आखली.

When will the work of Pavit Nal scheme pipeline | पवनीत नळ योजनेच्या पाईपलाईनचे काम केव्हा होणार

पवनीत नळ योजनेच्या पाईपलाईनचे काम केव्हा होणार

Next

नागरिक त्रस्त : प्रेशर पाईपलाईन योजना थंडबस्त्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : पवनीकरांना समप्रमाणात पाणी पुरवठा होत नाही तो दूर करण्यासाठी पालिका प्रशासनाने प्रेशर पाईपलाईनची योजना आखली. कोट्यवधी रूपयाचे प्रेशर पाईपलाईनचे काम नगरातील प्रत्येक रस्त्यावर सुरू आहे. प्रेशर चेक करण्यासाठी पाईपलाईन मधून पाणी सोडण्यात आले आणि नागरिकांना दहा दिवसापासून पाण्यासाठी त्रस्त व्हावे लागत आहे. नळाद्वारे थेंब थेंब पाणी येत असल्याने कित्येक वॉर्डात नागरिकांची ओरड सुरू आहे.
एक ते दीड महिन्यापासून नगरात प्रेशर पाईप लाईनचे काम सुरू आहे. सिमेंट काँक्रीटचे रस्ते ड्रीलींग मशीनद्वारे खोदूर पाईपलाईन टाकणे सुरू आहे. काही रस्त्यावर पाईपलाईनचे काम झालेले आहे. पाईपलाईनचे झालेले काम असताना रस्ते समतल करण्यात आलेले नाही त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झालेला आहे. नगराध्यक्षासह सर्व नगरसेवक नवशिखे असल्याने कंत्राटदारावर पदाधिकारी व अधिकारी यांचे नियंत्रण नाही. त्यामुळे वाटेल त्या पद्धतीचे काम सुरू आहे. काही ठिकाणी पाईपलाईनमध्ये नालीचे पाणी सुद्धा गेलेले आहे तसेच पाईप कापल्याने निघणारा किससुद्धा पाईपलाईनमध्ये गेलेला आहे.
प्रेशर चेक करण्यासाठी प्रेशर पाईपमध्ये पाणी सोडले असता त्या दिवशी नळधारकांना भरपूर पाणी मिळाले व त्या प्रेशरमुळे पाईपचा किस नळधारकांच्या पाईपमध्ये गेल्याने दुसऱ्या दिवसीपासून थेंब थेंब पाणी नळाद्वारे मिळत आहे. नेताजी वॉर्ड व नंदरधने ले-आऊट या भागात ही समस्या गंभीर आहे. नळधारकांना त्रास होवू नये त्यांना नियमित व पुरसा पाणी मिळावे यासाठी पालिका प्रशासनाने प्रेशर पाईप लाईनच्या कामावर काटेकोरपणे देखरेख ठेवावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

Web Title: When will the work of Pavit Nal scheme pipeline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.