-तर पवनीचा विकास झाला असता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 09:48 PM2019-03-09T21:48:25+5:302019-03-09T21:48:43+5:30
येथील वैनगंगा नदीवर सन १९८० अगोदर पुल बनायचा होता. त्यामुळे नदीला पूर राहत असल्यामुळे येथील जनतेला पुरातून डोंग्याने जावून सिंदपुरी येथून एस.टी. बसने भंडाऱ्याला जावे लागत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : येथील वैनगंगा नदीवर सन १९८० अगोदर पुल बनायचा होता. त्यामुळे नदीला पूर राहत असल्यामुळे येथील जनतेला पुरातून डोंग्याने जावून सिंदपुरी येथून एस.टी. बसने भंडाऱ्याला जावे लागत होते. त्यामुळे सहा महिने भंडाराशी संपर्क राहत नव्हता. उलट येथून नागपुरला जाणे सोपे होते. त्यामुर्ळं त्यावेळेस येथील जनतेची नागपूर जिल्ह्याला जोडण्याची मागणी होती. त्यावेळेस ही मागणी पूर्ण झाली असती तर ऐतिहासिक प्राचीन पवनी शहराचा विकास व्हायला वेळ लागला नसता.
ऐतिहासिक, प्राचीन पवनी शहरामध्ये पर्यटनाचा व इतर विकास करण्यात सर्व काही आहे. पण येथील लोकप्रतिनिधी, राजकीय नेते यांची विकास करण्यात दूरदृष्टी नाही. त्यामुळे इतर शहरांच्या लोकसंख्या वाढत असताना येथील लोकसंख्या कमी का झाली व त् यावर काय उपाय आाहेत याचे मंथन करण्याची गरज आहे.
ज्यावेळेस १९८० पूर्वी वैनगनगा नदीवर पुल बनायचा होता. त्यावेळेस पुरातून जीव मुठीत धरून डोंग्याने नदीतून जावून सिंदपुरीवरून भंडाऱ्याला जावे लागत होते. त्यामुळे पावसाळ्यात सहा महिने पर्यंत भंडाºयाशी संपर्क राहत नव्हता. अतिमहत्वाच्या कामालाच जावे लागत होते. उलट नागपूर दूर असूनही नियमित बससेवा कोणतेही अडथळे न येता नागपुरला जाणे सोपे होते. त्यामुळे नेहमी संपर्क नागपूरशी होता. त्यामुळे येथील जनतेची पवनी शहर नागपूर जिल्ह्याला जोडण्याची मागणी होती पण ही मागणी पूर्ण झाली नाही.
वैनगंगा नदीवर पुल तयार करण्याकरिता माजी आ.स्व.रामकृष्ण काटेखाये यांनी विशेष प्रयत्न केल्यामुळे येथील जनता नेहमी भंडारा मुख्यालयाशी संपर्कात आहे. पण जर येथील जनतेची नागपूर जिल्ह्याला जोडण्याची मागणी पूर्ण झाली असती तर पवनीचा फार मोठा विकास झाला असता.