काेण सरपंच हाेणार, सस्पेन्स कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:34 AM2021-01-20T04:34:58+5:302021-01-20T04:34:58+5:30
जिल्ह्यात ५४१ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण साेडत ११ डिसेंबर राेजी पार पडली हाेती. त्यात २७१ सरपंच पद महिलांसाठी निश्चित ...
जिल्ह्यात ५४१ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण साेडत ११ डिसेंबर राेजी पार पडली हाेती. त्यात २७१ सरपंच पद महिलांसाठी निश्चित करण्यात आले हाेते. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागास प्रवर्ग आणि खुला प्रवर्गासाठी सरपंच पद निश्चित करण्यात आले हाेते. मात्र शासनाने आदेश निर्गमित करून या आरक्षण साेडतीला स्थगिती देत निवडणुकीनंतर आरक्षण साेडत काढण्याचे ठरविले. त्यामुळे निवडणुकीत अनेकांनी सरपंच पदाच्या आशेने उमेदवारी दाखल केली हाेती. त्यातील अनेक जण निवडूनही आले आहेत. परंतु आता सरपंच पदी काेण विराजमान हाेणार हे तूर्तास कुणीही निश्चितपणे कुणीही सांगू शकत नाही. त्यामुळेच गावागावात सरपंच पदाची उत्सुकता दिसून येत आहे.
बाॅक्स
सदस्यांची यादी प्रसिद्धीनंतर साेडत
राज्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या सदस्यांची यादी शासनस्तरावर प्रसिद्ध केली जाते. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला पाठविली जाते. ही यादी प्रसिद्ध झाल्यानंतर सदस्यांना अधिकृत अधिकार प्राप्त हाेतात. यंदा २९ जानेवारी राेजी ग्रामपंचायतीच्या सदस्यांची शासनस्तरावर यादी प्रसिद्ध हाेईल असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आरक्षण साेडतीसाठी किमान दाेन आठवडे प्रतीक्षा करावी लागेल.
काेट
सरपंच आरक्षण साेडतीसंदर्भात नवीन प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. ग्रामपंचायत सदस्यांची शासनस्तरावर यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आरक्षण साेडत निघण्याची शक्यता आहे.
- शिवराज पडाेळे
निवासी उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी