जिथे श्रद्धा, विश्वास तिथेच भगवंत

By Admin | Published: February 1, 2015 10:51 PM2015-02-01T22:51:19+5:302015-02-01T22:51:19+5:30

मानवाच्या जिवनात अनेक दु:ख व कष्ट येतात. हे दु:ख दूर करण्यासाठी आपल्या समस्यांचे समाधान शोधण्यासाठी अनेक जण इकडे तिकडे भटकतात. ते जेव्हा या मानवधर्माची शिकवण

Where there is faith, believe in God there | जिथे श्रद्धा, विश्वास तिथेच भगवंत

जिथे श्रद्धा, विश्वास तिथेच भगवंत

googlenewsNext

परमात्मा एक सेवक संमेलन : लता बुरडे यांचे प्रतिपादन
मोहाडी : मानवाच्या जिवनात अनेक दु:ख व कष्ट येतात. हे दु:ख दूर करण्यासाठी आपल्या समस्यांचे समाधान शोधण्यासाठी अनेक जण इकडे तिकडे भटकतात. ते जेव्हा या मानवधर्माची शिकवण घेतात त्यांचे सर्व दु:ख व चिंता दूर होते. मानवधर्म स्वीकारल्यावर सट्टा, जुगार, मदिरा सारखे वाईट व्यसन कायमचे बंद होतात. त्यांना भगवंत प्राप्ती होऊन माणूस आनंदमयी जीवन जगतो. यासाठी श्रद्धा व विश्वास असणे गरजेचे आहे. श्रद्धा व विश्वास आहे तिथेच भगवंताचा वास असतो, असे प्रतिपादन आध्यात्मिक प्रमुख व मानवधर्म प्रचार व प्रसारिका लता बुरडे यांनीकेले.
बहुउद्देशिय परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडीच्या वतीने भव्य सेवक संमेलन व शोभा यात्रेचे आयोजन दरवर्षी ३० जानेवारीला करण्यात येते. या कार्यक्रमाचे उद्घाटन लता बुरडे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष यशवंत ढबाले गुरुजी तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य मंजुषा पातरे, किशोर चौधरी, नरेश ईश्वरकर, नरेश सव्वालाखे आदी उपस्थित होते.
लता बुरडे म्हणाल्या, जन्म घेतलेल्या प्रत्येकाचाच मृत्यू अटळ आहे. जिवंतपणी अहंकार, द्वेष करणे हा गुन्हा आहे. भगवान दिसत नाही, पण तो प्रत्येक ठिकाणीच असतो हे प्रत्येकाने जाणून घेणे आवश्यक आहे. याप्रसंगी प्रमुख अतिथींनी सेवकांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला जवळपास ६० हजार लोकांची उपस्थिती असल्याने मोहाडीचे प्रभारी ठाणेदार गिते यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार जगन्नाथ गिऱ्हेपुंजे, राजेश बाभरेसह अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
परमात्मा भवनापासून ते अर्धा कि.मी. पर्यंत विविध प्रकारच्या साहित्यांची दुकाने थाटलेली होती. जाणाऱ्या येणाऱ्या भाविकांना त्रास होऊ नये, यासाठी पोलीस वारंवार गर्दी नियंत्रणासाठी प्रयत्न करीत होते. संचालन अविनाश चौधरी व नरेश ठवकर यांनी तर कार्यक्रमाची व्यवस्था ज्ञानेश्वर कावळे, अरुणा देशभ्रतार, रामनारायण धकाते, नरेंद्र मडावी, सतीश वैद्य, देवीदास धुळे, प्रदीप तायडे, सिद्धार्थ रामटेके, धनराज शेंडे, जयवंता सव्वालाखे, धकाते,सादिक खान व सेवकांनी सांभाळली. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Where there is faith, believe in God there

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.