गर्भपात करणाऱ्यांना अभय कुणाचे?

By admin | Published: April 15, 2015 12:41 AM2015-04-15T00:41:14+5:302015-04-15T00:41:14+5:30

अवैधरित्या गर्भपात करणाऱ्यांना कठोर शिक्षेची तरतुद असताना साकोली तालुक्यात हा गोरखधंदा राजरोसपणे सुरु आहे.

Who aborted abortion? | गर्भपात करणाऱ्यांना अभय कुणाचे?

गर्भपात करणाऱ्यांना अभय कुणाचे?

Next

आरोग्य विभागाचे दुर्लक्ष : साकोली तालुक्यात गर्भपाताचे दोन बळी
संजय साठवणे भंडारा
अवैधरित्या गर्भपात करणाऱ्यांना कठोर शिक्षेची तरतुद असताना साकोली तालुक्यात हा गोरखधंदा राजरोसपणे सुरु आहे. याला जबाबदार कोण? असा प्रश्न साकोली तालुक्यात दोन तरुणींचा नाहक बळी गेल्यामुळे निर्माण झाला आहे. याला शासन, प्रशासनाचा नाकर्तेपणा कारणीभूत ठरला असून गर्भपात करणाऱ्यांना अभय कुणाचे? हा प्रश्न अस्वस्थ करणारा आहे.
साकोली तालुक्यातील काही गावात अवैधरित्या गर्भपात करुन पैसे कमविण्याचा गोरखधंदा सुरु आहे. त्यासाठी एजंटची मदत घेतली जाते. मागीलवर्षी पिंडकेपार येथे गर्भपात करताना एका तरुणीचा मृत्यू झाला होता. या महिन्यात सातलवाडा येथे दुसरी घटना घडली. या दोन्ही घटनांची पोलिस ठाण्यात नोंद आहे. मात्र यापुर्वी घडलेल्या अनेक गर्भपाताच्या प्र्रकाराची माहिती पोलिसांकडे नाही. अवैधरित्या गर्भपात करणे कायद्यानुसार गुन्हा आहे. याची माहिती असुनही बोगस डॉक्टरांचा हा गोरखधंदा राजरोसपणे सुरू आहे. सामान्य जनतेला या बोगस डॉक्टरांची माहिती असताना पोलीस, आरोग्य विभागाला त्यांची माहिती का मिळत नाही, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. त्यामुळे या समस्येला वाचा फोडण्यासाठी जनतेनेच समोर येण्याची गरज आहे.

गुप्तचर विभागाचे काय?
पोलीस प्रशासनात गुप्तचर विभाग आहे. या गुप्तचर विभागाने जर अवैध गर्भपात करणाऱ्याकडे बारकाईने नजर टाकल्यास हा प्रकार घडणार नाही. शासनाने याकडे विशेष लक्ष देऊन होणारे मृत्यूचे प्रमाण टाळता येऊ शकते.

शासनाने महिलाच्या सुरक्षेसाठी कठोर कायद्याची तरतुद केली असली तरी त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. साकोली तालुक्यात गर्भपात करण्याचा गोरखधंदा गुप्तपणे सुरू आहे. एखाद्या गावात असा प्रकार सुरू असल्यास त्याची गावकऱ्यांनी पोलिसात तक्रार करावी. पोलिसांनी तक्रारकर्त्याचे नाव गोपनीय ठेवून सहकार्य करावे. शासनाने अवैध गर्भपाताचे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे.
- इंद्रायणी कापगते
महिला समुपदेशक साकोली.

Web Title: Who aborted abortion?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.