‘तो’ सेटिंगबाज कर्मचारी कोण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 11:37 PM2017-11-17T23:37:10+5:302017-11-17T23:38:03+5:30
ग्रामीण विकासाचा कणा असलेल्या जिल्हा परिषद प्रशासकीय इमारतीत विविध विभागांची कार्यालय आहेत.
प्रशांत देसाई ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : ग्रामीण विकासाचा कणा असलेल्या जिल्हा परिषद प्रशासकीय इमारतीत विविध विभागांची कार्यालय आहेत. येथील एका विभागात कार्यरत एका कर्मचाºयाने त्याच्या विभाग प्रमुखाची मर्जी सांभाळून त्रृटी पूर्ण झालेल्या फाईल्स स्वत:कडे घेवून लाभार्थी कर्मचाºयांना फोन करून पैशाची मागणी करीत आहे. जिल्हा परिषदमधील एका विभागात कार्यरत या कर्मचाºयाच्या उपदव्यापामुळे अनेक अधिनस्थ कर्मचारी कर्मचारी त्रस्त झाले असून ‘तो’ कर्मचारी कोण, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
जिल्हा परिषदच्या इमारतीत आरोग्य, कृषी, समाजकल्याण, लघु पाटबंधारे विभाग, बांधकाम, शिक्षण, वित्त, पशुसंवर्धन यासह अनेक महत्वाची विभाग आहेत. यातीलच नागरिकांच्या अत्यंत निगडीत असलेल्या एका विभागात मागील काही दिवसांपासून येथीलच एक कर्मचारी दिवसाढवळ्या एकप्रकारे 'लुट' करीत आहे. येथील विभागप्रमुख नव्यानेच रूजू झाले असून या कर्मचाºयाने आपल्या वरिष्ठाची मर्जी सांभाळल्याचे यावरून दिसून येते.
सदर कनिष्ठ कर्मचाºयाकडे नव्यानेच नवीन धुरा सोपविण्यात आली आहे. पुर्वीच्या कर्मचाऱ्याने आपले कर्तव्यपालन करताना त्यांच्या अधिनस्त कर्मचाºयांच्या शासकीय देयकांच्या फाईल्समधील त्रृट्या पुर्ण करून त्या विभागप्रमुखाकडे सादर केल्या होत्या.
सदर विभाग प्रमुखाच्या स्वाक्षरीनंतर त्या फाईल्स थेट मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्याकडे अंतिम देयके कर्मचाºयांना देण्यासंदर्भात पाठविण्यात येणार होत्या. मात्र सदर कनिष्ठ कर्मचाºयाने त्याच्याकडे प्रभार येताच त्याच्या विभाग प्रमुखाकडील अनेक फाईल्स स्वत:च्या ताब्यात घेतल्या. या फाईल्स ज्या कर्मचाºयांच्या आहेत त्यांना या कनिष्ठ कर्मचाºयाने स्वत:च्याच भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा सपाटा सुरू केला. यात सदर कर्मचारी लाभार्थ्यी कर्मचाऱ्यांकडून थेट पैशाची मागणी करीत आहे. सदर कर्मचारी हा पूर्णवेळ कर्मचारी असला तरी अनेकदा हा बाहेरील चहा-टपरी किंवा जिल्हा परिषदेच्या परिसरात मोबाईलवरूनच अनेकदा बोलताना दिसून येतो.
यावरूनच या कर्मचाऱ्याबाबत त्याच्या अधिनस्त कर्मचाºयांमध्ये असंतोष पसरलेला आहे. केवळ पैशाच्या मागणीपोटी हा कर्मचारी अनेकांना त्रस्त करीत आहे. पैसे दिल्यास हातोहात फाईल क्लिअर करा, असा संदेश तो निर्ढावपणे सांगत आहे. त्यामुळे या भ्रष्टाचारी कर्मचाºयासह त्याचे विभाग प्रमुखही या प्रकरणात गुंतले असल्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे ‘तो’ कर्मचारी कोण असा प्रश्न जिल्हा परिषद प्रशासनातील कर्मचारी एकमेकांना विचारताना दिसत आहे.