शहराच्या विद्रुपीकरणाला जबाबदार कोण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:36 AM2021-09-11T04:36:48+5:302021-09-11T04:36:48+5:30
भंडारा : शहरातील विविध प्रमुख चौकांमध्ये लागणाऱ्या अनधिकृत बॅनरमुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. विशेष म्हणजे कारवाई करण्याची जबाबदारी असलेल्या ...
भंडारा : शहरातील विविध प्रमुख चौकांमध्ये लागणाऱ्या अनधिकृत बॅनरमुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. विशेष म्हणजे कारवाई करण्याची जबाबदारी असलेल्या नगरपरिषदेच्या चौकामध्येच अनधिकृत बॅनर लागत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
एक-दोन अपवाद वगळता वर्षभरात कारवाई झाली नाही. त्यामुळे शहराच्या विद्रुपीकरणाला जबाबदार कोण, असा प्रश्न शहरवासीयांना पडला आहे. नगरपालिकेच्या जाहिरात वसुली विभाग असतो. मात्र, या विभागात असलेले कर्मचारी अनधिकृत फलक काढण्यास धजावत नाही. मनुष्यबळाची कमतरता आणि साधनांच्या अभावामुळे कारवाई थंडबस्त्यात असल्याची माहिती आहे. संबंधित विभागाने अतिक्रमण निर्मूलन विभागाची मदत घेऊन अनधिकृत फलक काढण्याची मोहीम राबविण्याची नितांत गरज आहे.
बॉक्स
या ठिकाणाकडे कोण लक्ष देणार?
शहरातील सर्वच मुख्य चौकांमध्ये डिजिटल बॅनर, तसेच कर्शियल व्होर्डिंग लावलेले दिसतात.
त्रिमूर्ती चौक, राजीव गांधी चौक, जिल्हा परिषद चौक, शास्त्री चौक, गांधी चौकात बॅनर अधिक दिसतात.
या ठिकाणांकडे नेमके कोण लक्ष देणार, असा प्रश्न भंडारा शहरातील शहरवासीयांना पडला आहे.
बॉक्स
वर्षभरापासून कारवाई नाही
शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत डिजिटल बॅनर लागत असताना गत दोन वर्षांपासून कारवाई होताना दिसत नाही.
विधानसभा निवडणुकीवेळी भंडारा शहर बॅनरमुक्त झाले होते. त्यानंतर ठोस कारवाई होताना दिसली नाही. आता तर शहरात बॅनरबाजी वाढली आहे.
बॉक्स
काय होऊ शकते कारवाई?
पोलीस विभागाच्या परवानगीनंतर नगरपरिषदेतर्फे बॅनर लावण्यासाठी नियमानुसार परवानगी मिळते.
बॅनरच्या आकारानुसार भाडे आकारले जाते. बॅनरचा आकार आणि दिवस यावर दर आकारला जातो.
बॅनर जप्त करणे, दंड आकारणे प्रसंगी गुन्हा दाखल होऊ शकतो.
कोट
नगरपरिषदेची परवानगी घेतल्यानंतरच बॅनर, व्होर्डिंग लावण्याचा नियम आहे. मात्र, अनेकजण नियमांचे उल्लंघन करून बॅनर लावत आहेत. अनधिकृत बॅनरबाजांविरुद्ध नगरपरिषदेच्या संयुक्त पथकाद्वारे लवकरच कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी लवकरच सभा घेण्यात येईल.
- एक अधिकारी, नगरपरिषद, भंडारा.