रक्ताचे ‘ते’ डाग कुणी लावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 10:03 PM2018-07-03T22:03:03+5:302018-07-03T22:04:23+5:30
२४ जूनला सायंकाळी ६ वाजता आशिष चौरे हा मद्यप्राशन करून माझ्या कार्यालयात येऊन धिंगाणा घालू लागला. त्यामुळे मी स्वत: तुमसरच्या पोलीस निरीक्षकांना बोलावले. पोलिसांनी त्याला घेऊन गेले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पंकज कारेमोरेच्या कार्यालयात पत्रपरिषद घेतली. त्यावेळी त्याच्या टी-शर्टवर रक्ताचे डाग होते. कोणतीही मारहाण केली नसताना रक्ताचे डाग लावून मला गोवण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : २४ जूनला सायंकाळी ६ वाजता आशिष चौरे हा मद्यप्राशन करून माझ्या कार्यालयात येऊन धिंगाणा घालू लागला. त्यामुळे मी स्वत: तुमसरच्या पोलीस निरीक्षकांना बोलावले. पोलिसांनी त्याला घेऊन गेले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पंकज कारेमोरेच्या कार्यालयात पत्रपरिषद घेतली. त्यावेळी त्याच्या टी-शर्टवर रक्ताचे डाग होते. कोणतीही मारहाण केली नसताना रक्ताचे डाग लावून मला गोवण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आमदार चरण वाघमारे यांनी पत्रपरिषदेत केली.
यावेळी ते म्हणाले, माझ्या कार्यालयात चौरे यांना कुणीही मारहाण केली नाही. पोलिसांनी त्याला घेऊन गेल्यानंतर तो प्रकृती बरी वाटत नसल्याचे सांगितल्यामुळे त्याला उपजिल्हा रूग्णालयात नेण्यात आले. तिथे उपचार करून डिस्चार्ज देण्यात आले. त्यानंतर त्याला भंडारा जिल्हा रूग्णालयात पाठविले. दुसऱ्या दिवशी २५ जूनला दुपारी १२ वाजता आशिष चौरे भंडारा रूग्णालयातून तुमसरला जाण्यासाठी निघाला. त्यानंतर ३ वाजेच्या सुमारास पंकज कारेमोरेच्या कार्यालयात पत्रपरिषद घेतली. या पत्रपरिषदेत टी-शर्ट रक्ताने माखल्याचे दिसून आले. पत्रपरिषद संपल्यानंतर तो कुठे गेला, त्या रात्री कुठे होता, पत्रपरिषदेसाठी भंडारा रूग्णालयातून तुमसरात कुणाच्या परवानगीने आला. डॉक्टरांनी त्याला जाताना नोंदी घेतल्या का? २६ जूनला चौरेला पाहण्यासाठी माजी खासदार नाना पटोले गेले त्यावेळी तो रूग्णालयात होता. यासर्व प्रकरणात मला गोवण्यात येत असल्याचा आरोपही आ.वाघमारे यांनी केला.
पोलिसांनी त्याला नेले त्यावेळी त्याला जखमा होत्या का? दुसऱ्या दिवशी त्याच्या टी-शर्टवर रक्त कुठून आले, ते रक्त कुणी लावले, याचा निष्पक्ष तपास करण्याची मागणी करून ती टी-शर्ट फॉरेन्सिक लॅबकडे पाठवून त्यातील सत्यता बाहेर यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
त्या बँक अधिकाऱ्यांवर कारवाई करा
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कल्याण योजने अंतर्गत ज्या शेतकºयांच्या खात्यात अद्यापपर्यंत पैसे जमा झालेले नाही. अशा शेतकऱ्यांना बँकेचे अधिकारी त्रास देत आहेत. त्यांच्याकडून कोणीही सक्तीची वसुली करू नये, असे शासनाचे निर्देश असतानाही बँकेचे अधिकारी जाणीवपूर्वक त्रास देत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे शेतकºयांना त्रास देणाऱ्या बँकेच्या अशा अधिकाºयांविरूद्ध कारवाई करण्याबाबत आपण जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचे आ.वाघमारे यांनी सांगितले.