रेतीच्या डम्पिंग यार्डला अभय कुणाचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2020 05:00 AM2020-03-09T05:00:00+5:302020-03-09T05:00:11+5:30

वैनगंगा नदीवरील कवलेवाडा धरणाचे शेजारी वांगी गावाचे वास्तव्य आहे. पिपरी चुन्ही गट ग्राम पंचायत अंतर्गत वांगी गावाचा प्रशासकीय कामकाज संचालीत होत आहे. वांगी गावाचे शिवारात वैनगंगा नदीचे काठावर महसूल विभागाची झुडपी जंगल असणारी जागा आहे. याच जंगलाच्या शेजारी देवस्थान आहे. या जंगलात रेती माफियांनी झुडपी जंगलातील मौल्यवान वृक्षाची कत्तल करीत डम्पिंग यार्ड तयार केला आहे,

Who's Abhay to the sand dumping yard? | रेतीच्या डम्पिंग यार्डला अभय कुणाचे?

रेतीच्या डम्पिंग यार्डला अभय कुणाचे?

Next
ठळक मुद्देपरजिल्ह्यात रेतीची वाहतूक : वांगी गावानजीकच्या झुडपी जंगलातील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : पिपरी चुन्ही गट ग्राम पंचायत असणाऱ्या वांगी गावाच्या शिवारात झुडपी जंगलात रेतीचे डम्पिंग यार्ड तयार करण्यात आला आहे. या डम्पिंग यार्डला अभय कुणाचे? असा सवाल गावकरी विचारत आहेत. गावकरी संताप व्यक्त करीत आहेत.
वैनगंगा नदीवरील कवलेवाडा धरणाचे शेजारी वांगी गावाचे वास्तव्य आहे. पिपरी चुन्ही गट ग्राम पंचायत अंतर्गत वांगी गावाचा प्रशासकीय कामकाज संचालीत होत आहे. वांगी गावाचे शिवारात वैनगंगा नदीचे काठावर महसूल विभागाची झुडपी जंगल असणारी जागा आहे. याच जंगलाच्या शेजारी देवस्थान आहे. या जंगलात रेती माफियांनी झुडपी जंगलातील मौल्यवान वृक्षाची कत्तल करीत डम्पिंग यार्ड तयार केला आहे, असे करीत असतांना कुणी अटकाव केला नाही. यामुळे रेती माफीयांचे मनोबल वाढले आहे. त्यांनी चक्क डम्पिंग यॉर्डमध्ये रेतीचा उपसा करण्याकरिता झुडपी जंगलातून रस्ता तयार केला आहे. नदीचे पात्रापर्यंत रस्ता तयार करीत असताना मौल्यवान झाडांची कत्तल करण्यात आली आहे. दिवस आणि रात्र नदी पात्रातून रेतीचा उपसा करण्यात आल्यानंतर डम्पिंग यार्डमध्ये साठवणुक करण्यात येत आहे. या रेतीची विक्री रात्री करण्यात येत आहे. कवलेवाडा धरण मार्ग वरुन गोंदिया जिल्ह्यात रेतीची वाहतुक करण्यात येत आहे. रोज रात्री २५ ते ३० ट्रकमध्ये रेतीची विक्री करण्यात येत असतांना प्रशासन झोपेचे सोंग घेत आहे. या डम्पिंग यॉर्डपासून सिहोरा पोलीस ठाणे आठ किमी आणि तलाठी कार्यालय ४ किमी अंतरावर आहे. परंतु आजवर या डम्पिंग यार्डमधील रेती माफियांचे विरोधात कारवाई झाली नाही.
गावात बेधडक रेतीचा उपसा आणि विक्री सुरु असतांना प्रशासकीय यंत्रणा कारवाई करीता पुढाकार घेत नाही. यामुळे गावकºयात माफियांचे विरोधात संताप आहे. धरण आणि कवलेवाडा धरण मार्गाला जोडणाºया या मार्गावरुन रेतीची ओव्हरलोडेड वाहतूक असल्याने रस्त्यावर खड्डे पडली आहेत. यामुळे अपघाताची शक्यता बनावली असून झुडपी जंगलातील जागा वन विभागाचे ताब्यात नसल्याने त्यांनी कधी कत्तल करण्यात आलेल्या झाडांची चौकशी केली नाही. या शिवाय माफीयांचे विरोधात कारवाई करीता पुठाकार घेतला नाही. जंगलात अनेक माफिया या डम्पिंग यार्डमध्ये गुंतले असतांना प्रशासन कारवाई करीत नाही. या माफियांना यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी विरोधात ग्राम पंचायतमार्फत फेब्रुवारी महिन्यात पोलीस ठाणे, तहसील कार्यालयात तक्रार करण्यात आली होती. परंतु साधी चौकशीही झाली नाही. या शिवाय ग्राम पंचायत प्रशासनाला पोलिसाचे सहकार्य मिळाले नाही. मात्र रेती माफियांना सहकार्य मिळत असल्याने त्यांनी पुन्हा डम्पिंग यार्ड तयार केले आहे.

वांगी गावाचे हद्दीत असणारे रेतीचे डम्पिंग यार्ड बंद करण्याकरिता फेब्रुवारी महिन्यात पोलीस निरीक्षक व तहसीलदारांना निवेदन दिली आहे. परंतु साधी दखल घेण्यात आली नाही. यात शंका आहे.
- सुखदेव राऊत,
उपसरपंच, पिपरी-चुन्ही-वांगी

ग्राम पंचायतीच्या जागेत ढीग
वांगी गावाच्या हद्दीतील गट नं. ९८ मध्ये रेतीचे डम्पिंग यार्ड तयार करण्यात आले. ही जागा ग्राम पंचायत चे नियंत्रणात आहे. यामुळे वरिष्ठांना लक्ष घालण्याकरिता तक्रार दिली होती. परंतू कारवाई झाली नाही.

Web Title: Who's Abhay to the sand dumping yard?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.