जेवणाळा ते पालांदूर रस्त्याचे रुंदीकरण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 05:08 AM2021-02-28T05:08:48+5:302021-02-28T05:08:48+5:30
लाखनी तालुक्यातील पालांदूर गाव सर्वात मोठे गाव असून, येथे शाळा, महाविद्यालय, विविध बँका, पोलीस ठाणे, रुग्णालय व बाजारपेठ ...
लाखनी तालुक्यातील पालांदूर गाव सर्वात मोठे गाव असून, येथे शाळा, महाविद्यालय, विविध बँका, पोलीस ठाणे, रुग्णालय व बाजारपेठ असून, परिसरातील नागरिकांना दररोज विविध कामानिमित्त पालांदूर येथे आवागमन करावे लागते. तसेच मानेगाव ते पालांदूर मार्गावरून लाखांदूर, अड्याळ, पवनी, गडचिरोली, चंद्रपूरकडे राज्य परिवहन महामंडळाच्या विभागाची बससेवा सुरू आहे. तसेच पादचारी, सायकलस्वार, दुचाकी, चारचाकी वाहनधारकांना सतत प्रवास करावा लागतो.
प्रशासनाच्या संबंधित विभागाच्या यंत्रणेने वेळीच दखल घेऊन या रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण करण्याचे काम तात्काळ सुरू करण्याची मागणी भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देशपांडे, एस. के. वैद्य, बाळकृष्ण शेंडे, हरिदास बोरकर, भागवत दामले, वामन कांबळे, माधव बोरकर, हर्षवर्धन हुमने, कोमल कांबळे, जयपाल रामटेके, फाल्गुन वंजारी, रूपा मेश्राम, नंदू वाघमारे, तोताराम दहीवले, महादेव देशपांडे, अरुण ठवरे, दामोधर उके यांनी केली आहे.