पत्नीचा जाळून खून; पतीला आजन्म कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 11:55 PM2018-04-10T23:55:24+5:302018-04-10T23:55:24+5:30
पत्नीच्या अंगावर केरोसीन टाकून पेटवून दिल्याने तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.पी. पांडे यांनी आरोपी पतीला आजन्म सश्रम कारावास व पाच हजार रूपये द्रव्यदंडाची शिक्षा मंगळवारला सुनावली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : पत्नीच्या अंगावर केरोसीन टाकून पेटवून दिल्याने तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.पी. पांडे यांनी आरोपी पतीला आजन्म सश्रम कारावास व पाच हजार रूपये द्रव्यदंडाची शिक्षा मंगळवारला सुनावली आहे.
सुदेश मंगरू राऊत असे आरोपीचे नाव आहे. पलाडी येथील मालु चामलाटे हिचे १० वर्षांपूर्वी गावातीलच सुदेश राऊत याचेसोबत विवाह झाला होता. विवाहानंतर या दाम्पत्याला ९ वर्षांची मुलगी व ६ वर्षाचा मुलगा आहे. परंतु सुदेश हा लहानलहान कारणावरून वाद करून मालुला नेहमी मारहाण करीत होता. २ नोव्हेंबर २०१५ च्या सायंकाळी ६.३० वाजता दरम्यान मालुची मुलगा रिंकू हा रडत रडत आजीच्या घरी जावऊन वडिलाने आईला पेटविल्याचे सांगितले.
त्यानंतर मालुची आई पंचफुला चामलाटे रा.पलाडी यांनी नातवासोबत मालुच्या घरी गेली असता घराच्या छपरीत मालुच्या अंगावरील कपडे हात, पाय, चेहरा, पोटाचा भाग जळालेला दिसून आला.
त्यानंतर पंचफुला यांनी कारधा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून आरोपी विरूध्द भादंवि ३०२ कलमान्वये गुन्हा नोंदविला. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक विनोद रहांगडाले यांनी करून आरोपी सुदेश राऊत याला अटक केली. त्यानंतर आरोपीविरूध्द सत्र न्यायालय आरोपपत्र दाखल करण्यात आले. त्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश पांडे यांच्या न्यायालयात सुनावणी करण्यात आली.
सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील अॅड.विश्वास तवले यांनी बाजू मांडून साक्षदार तपासले. गुन्ह्याचे स्वरूप व गांभिर्य लक्षात घेऊन आरोपी सुदेश राऊत विरूद्ध दोषसिध्द झाल्याने भादंवि ३०२ कलमान्वये आजन्म सश्रम कारावास व ५००० रूपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने कारावास अशी शिक्षा सुनावली. या गुन्ह्यात पोलीस निरीक्षक रविंद्र मानकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार सिताराम ब्राम्हणकर यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.