औषधातून विष देऊन पत्नीचा खून

By admin | Published: May 31, 2016 12:40 AM2016-05-31T00:40:55+5:302016-05-31T00:40:55+5:30

दीड महिन्यापूर्वी लग्न झालेली विवाहिता पतीसोबत माहेरी आली. पत्नीला पतीने औषधातून विष दिल्याने पत्नीला रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यूमुखी पडली.

Wife's blood by poisoning drugs | औषधातून विष देऊन पत्नीचा खून

औषधातून विष देऊन पत्नीचा खून

Next

पती फरार : मृत मुलीच्या आईचा आरोप
तुमसर : दीड महिन्यापूर्वी लग्न झालेली विवाहिता पतीसोबत माहेरी आली. पत्नीला पतीने औषधातून विष दिल्याने पत्नीला रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यूमुखी पडली. ही दुर्देवी घटना रविवारी दुपारी ३ च्या सुमारास घडली. मृत नवविवाहितेचे नाव सोनी अनिल मेश्राम (१९) रा.पिपरी चुन्नी ता.तुमसर असे आहे.
दि. ३० मार्च रोजी सोनी अनिल मेश्राम रा.पिपरी चुन्नी हिचे लग्न सोमा उके (२४) रा.पैठेगाव ता.तिरोडा याच्याशी झाले होते. चार दिवसापूर्वी सोनी पती सोमा सोबत पिपरी चुन्नी येथे आली होती. शुक्रवारी पती पत्नी बाजाराला गेले होते. त्याच रात्री दोघेही घरी कुणालाही न सांगता नदीवर गेले. तेथून परत घरी आल्यावर शनिवारी पहाटे पती सोमा याने पत्नीला औषधातून विष दिले. सोनीने घरीच उलट्या केल्या. सोनीची प्रकृती खालाविल्याने प्रथम तिला सिहोरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती खालावल्याने डॉक्टरांनी तुमसर रेफर केले. उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान सोनीची प्रकृती जास्त बिघडली. तेव्हा पुन्हा तिला भंडारा येथे रविवारी रेफर करण्यात आले. भंडारा येथे नेतांना सोनीचा वाटेतच मृत्यू झाला.
तुमसर उपजिल्हा रुग्णालयात सोनी हिला परत आणताना पती सोमा हा खाली वाकला तेव्हा त्याच्या खिशातून विषाची बॉटल खाली पडली. सोनीची आई प्रभा मेश्राम हिने ती बघितली. तेव्हापासून पती सोमा रुग्णालयातून पळून गेला. सोनीच्या मृत्यूनंतर सिहोरा पोलीस ठाण्यात पती सोमा विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. सध्या सोमा फरार आहे. (तालुका प्रतिनिधी)

पती सोमा उके हा माझ्या मुलीला मानसिक त्रास देत होता. लग्न झाले तेव्हापासून पैशाची मागणी त्याने केली होती. दुचाकीची मागणीही त्याने केली होती. त्याने माझ्या मुलीला विष देवून ठार मारले. घटनेच्या समयी त्याच्याजवळ विषाची बॉटल होती.
- प्रभा मेश्राम
मुलीची आई

Web Title: Wife's blood by poisoning drugs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.