भूजलीतून विणली स्नेहबंधाची नाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 10:00 PM2018-08-28T22:00:45+5:302018-08-28T22:01:24+5:30

ग्रामीण भागात अनेक परंपरांचा अलिकडे ºहास होत आहे. अनेक कारणांमुळे जुन्या परंपरा जोपासणे कठीण जात आहे. अशा परिस्थितीतही भूजली सणाच्या माध्यमातून गावकऱ्यांनी स्नेहबंधाची नाती विणली. मोहाडी तालुक्यातील सिरसोली कान्ह. येथे पार पडलेल्या भूजली आनंदोत्सवात गावकरी एकत्र आले. परंपरेचा हा आनंदोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला.

Wife's Friendly Gift | भूजलीतून विणली स्नेहबंधाची नाती

भूजलीतून विणली स्नेहबंधाची नाती

Next
ठळक मुद्देसिरसोलीत उत्सव : परंपरा जपण्यासाठी गावकरी एकत्र

राजू बांते।
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : ग्रामीण भागात अनेक परंपरांचा अलिकडे ऱ्हास होत आहे. अनेक कारणांमुळे जुन्या परंपरा जोपासणे कठीण जात आहे. अशा परिस्थितीतही भूजली सणाच्या माध्यमातून गावकऱ्यांनी स्नेहबंधाची नाती विणली. मोहाडी तालुक्यातील सिरसोली कान्ह. येथे पार पडलेल्या भूजली आनंदोत्सवात गावकरी एकत्र आले. परंपरेचा हा आनंदोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला.
भाऊबहिणेचे नाते वृद्धींगत करणारा रक्षाबंधन उत्साहात साजरा होतो. तसाच लोधी क्षत्रीय समाजात रक्षाबंधनाचा पाडवा भूजली सणाने साजरा केला जातो. असाच भूजली सोहळा सिरसोली कान्हळगाव येथील महिला पुरुषांनी एकत्र येऊन साजरा केला. अलिकडे भूजली उत्सवाची सामाजिक परंपरा लयास जाऊ लागली होती. मात्र सिरसोलीचे सरपंच अंकुश दमाहे, रमेश बशिने, अरुण कस्तुरे, प्रताप लिल्हारे, सुखदेव दमाहे, राजू बावणे, नंदलाल दमाहे या युवकांनी भूजलीसाठी पुढाकार घेतला. मानव पंथाचा सन्मान करूनच लोधी समाजाची भूजली परंपरा कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच चार वर्षापासून पुन्हा भूजली आनंदोत्सव सुरु झाला. भूजली देवीची गाणी गात देवीचे स्मरण केले जाते.
गीता नागपुरे, विरुला बंधाटे, कंचना दमाहे, लिला बशिने, सीमा लिल्हारे, कला कस्तुरे आदींनी गीत गायन केले. सायंकाळच्या सुमारास डफ वाजवत महिलांना एकत्रित करण्यात आले. सर्व महिला हनुमान मंदिरात एकत्र जमल्या नवख्या सुनांना परंपरेची जाणीव महिलांनी करून दिली. भूजलीच्या प्रदक्षिणा घालत महिला गाणीही गात होत्या. त्यानंतर नऊ दिवसांची भूजली विसर्जीत करण्यात आली.
सर्व महिला गायमुख नदीच्या तिरावर गेल्या होत्या. सुवासिनींनी भूजली विसर्जीत केली. घरी आणली गेलेली भूजली कर्त्या पुरुष महिलांना देवून सुनांनी नमस्कार केला. त्यानंतर घरोघरी एकमेकांना भूजली देऊन मोठ्यांचे आशीर्वाद घेतले. स्नेहभेटीचा नातेसंबंध दृढ करणारा आणि एकतेची शक्ती वाढविणारा हा क्षण अख्ख्या गावाने एकत्र येऊन साजरा केला.
महिलांचा सन्मान
भूजली उत्सवाला प्रेरणा देण्यासाठी सरपंच अंकुश दमाहे यांच्या पुढाकाराने सर्व महिलांना ब्लाऊज पिस व किशोरवयीन मुलींना ओढणी देऊन सन्मान करण्यात आला. ग्रामपंचायत सदस्य वैशाली दमाहे, वच्छला बावणे, सीमा बशिने, सुनिता दमाहे, यशोदा दमाहे यांनी पुढाकार घेतला.
मुस्लीम बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग
सिरसोली येथील भूजली उत्सव लोधी समाजाचा असला तरी तो सर्व समावेशक झाल्याचे दिसत होते. मुस्लिम समाजबांधवही यात उत्साहाने सहभागी झाले होते. खलील छव्वारे, अजहर शेख, इस्माईल शेख, इरफान तेले, याकुब तेले, गफ्फार छव्वारे, जिब्राईल तेले यांनी सहभाग घेतला. तसेच रुपेश थुलकर, रत्नाकर वैद्य, सुनिल चव्हाण, सिद्धार्थ चव्हाण, शरद चव्हाण, प्रभू गाढवे, टोलीराम सार्वे, बाबू सार्वे यांनी उपस्थिती दर्शविली. यातून गावात राष्ट्रीय एकात्मतेच दर्शन घडले.

Web Title: Wife's Friendly Gift

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.