वन्य प्राण्यांचा पिकांमध्ये धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:24 AM2021-06-24T04:24:39+5:302021-06-24T04:24:39+5:30

नुकसानीची अनेक प्रकरणे वनविभागाच्या कार्यालयात दरवर्षी सादर करण्यात येतात. परंतु आर्थिक मदत दिली जात नाही. सध्या उन्हाळी धान व ...

Wild animals thrive in crops | वन्य प्राण्यांचा पिकांमध्ये धुमाकूळ

वन्य प्राण्यांचा पिकांमध्ये धुमाकूळ

Next

नुकसानीची अनेक प्रकरणे वनविभागाच्या कार्यालयात दरवर्षी सादर करण्यात येतात. परंतु आर्थिक मदत दिली जात नाही. सध्या उन्हाळी धान व अन्य पिके परिपक्व होण्याच्या अवस्थेत आहेत. यामुळे वन्य प्राण्यांचा हैदोस वाढत आहे. शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांच्या हल्ल्याची भीती सतावत असते. वन्यप्राण्यांच्या धुमाकूळ शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. पिकांचे नुकसान वन्यप्राणी दररोज करीत असल्याने बंदोबस्ताची मागणी शेतकऱ्यांकडून वारंवार वनविभागाला केली जात आहे. अनेकदा नुकसानीची माहिती वनविभागाला वेळेत देण्यात येते. परंतु वेळेत पंचनामे केले जात नाहीत. या गैरप्रकारांमुळे ही शेतकरी हैराण झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तर दुसरीकडे सततचे होत असलेले नुकसान यामुळे करावे तरी काय, असा प्रश्न शेतकरी वर्गासमोर निर्माण झाला आहे.

Web Title: Wild animals thrive in crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.