कायद्यातील सुधारणेमुळे अवैध दारूविक्री बंद होणार का?
By admin | Published: August 19, 2016 12:38 AM2016-08-19T00:38:20+5:302016-08-19T00:38:20+5:30
अवैध दारूविक्री करणाऱ्याला दहा वर्षाच्या दारूविक्रीवर चाप बसणार आहे. मात्र यासाठी पोलिसाची चौकशी महत्वपूर्ण ठरणार आहे.
साकोली : अवैध दारूविक्री करणाऱ्याला दहा वर्षाच्या दारूविक्रीवर चाप बसणार आहे. मात्र यासाठी पोलिसाची चौकशी महत्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे खरोखरच पोलीस अवैध दारू विक्रीवर कार्यवाही करणार की त्यांना हप्तेखोलीमुळे बगल देणार, हा खरा प्रश्न आहे.
तालुक्यात परवानाधारक दारू दुकाने मोजकीच असून अवैध दुकाने मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यातही काही गावे दारूबंदीची आहे, असे असताना काही वर्षापासून ना अवैध दारू विक्री बंदी झाली, ना दारूबंदी. पोलीस प्रशासनाला या अवैध दारू विक्रेते सैराट झाल्याचे चित्र आहे.
कायद्याच्या चौकटीत कडक कारवाईचे निर्बंध नसल्यामुळे अवैध दारू विक्रीकडे वळल्याने झिंग झिंग झिंगाट परिस्थिती निर्माण झाली आहे. यापूर्वी अवैध दारू विक्रेत्यांची जामिनावर सुटका होत होती. आता मात्र कायद्यात बदल करण्यात आली आहे. तालुक्यात ६४ ग्रामपंचायत अंतर्गत ९६ गावांचा समावेश आहे. यात हातावर मोजणारी ५ ते १० दुकान परवानाधारक सोडली तर अवैध दारू विक्रीचे अवैध दुकाने आहेत. अवैध दारू पुरवठ्यासह नवनवीन फंडे वापरून अवैध दारू पुरवठ्यासह दारू विक्री केली जाते. एकीकडे शासनस्तरावर दारूबंदी, तंटामुक्ती व्यसनमुक्ती गावे करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पुरस्कारांच्या माध्यमातून त्यांना पुरस्कृत केले जाते. परंतु गावकऱ्यांच्या या प्रामाणिक प्रयत्नावर अवैध दारू विक्रेत्यांकडून पाणी फेरल्या जाते. दुसरीकडे अवैध दारूविक्री प्रकरणात अडकला तरी कायद्याच्या चाकोरीतून लवकरच बाहेर निघण्याची सोय विक्रेत्यांना गवसल्याने या विक्रेत्यांच्या संख्येत वाढ झाली. मात्र आता अवैध दारू विक्री करणाऱ्यांची खैर नाही. अवैध दारू विक्री करणाऱ्यास पोलिसांनी रंगेहात पकडून गुन्हा दाखल केल्यास आणि त्यांच्या विरोधात सबळ पुरावे दिले तर त्या दोषीला न्यायव्यवस्था दहा वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होवू शकते. आता कायद्याच्या रखवालदारांनी त्या कायद्याची अंमलबजावणी इमानेइतवारे करवायाची आहे. यापूर्वी अनेकदा अवैध दारू विक्रेत्यांवर धाडी घालून पोलीस मुद्देमालासह आरोपींना अटक करत होती. अवैध दारू संदर्भात काही दंड भरून ती निर्दाेष सुटायचा आणि पुन्हा त्या अवैध दारूचा गोरखधंदा सुरू व्हायचा. (तालुका प्रतिनिधी)