शेतकऱ्यांना वाचविण्याचे काम करीत राहणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 10:19 PM2018-09-08T22:19:51+5:302018-09-08T22:20:16+5:30

केंद्र व राज्यातील भाजपच्या सरकारने शेतकरी व सर्वसामान्यांचे जगणे कठीण केले आहे. पोकळ आश्वासने देऊन राजकारण केले जात आहे. कर्जमाफी योजना, नोटबंदी, जीएसटी यासह अन्य सरकारचे धोरण शेतकऱ्यांसाठी घातक ठरले आहेत.

Will continue working to save the farmers! | शेतकऱ्यांना वाचविण्याचे काम करीत राहणार!

शेतकऱ्यांना वाचविण्याचे काम करीत राहणार!

googlenewsNext
ठळक मुद्देनाना पटोले : चारभट्टी येथील हनुमान मंदिर देवस्थानात हनुमान चालीसा पठन, महाप्रसाद कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : केंद्र व राज्यातील भाजपच्या सरकारने शेतकरी व सर्वसामान्यांचे जगणे कठीण केले आहे. पोकळ आश्वासने देऊन राजकारण केले जात आहे. कर्जमाफी योजना, नोटबंदी, जीएसटी यासह अन्य सरकारचे धोरण शेतकऱ्यांसाठी घातक ठरले आहेत. मागील वर्षी याच ठिकाणी ‘सरसकट कर्जमाफी न झाल्यास राजीनामा देऊन, जिथे जाणार तिथे लाईन लावणार’ असे बोललो होतो. आपण बोललेला शब्द खरा ठरला आहे. येणारा काळ आपला आहे. राजकारणापलीकडे शेतकऱ्यांना वाचविण्याचे काम करणार आहोत, असे प्रतिपादन माजी खासदार नाना पटोले यांनी केले आहे.
चारभट्टी/पुयार येथील हनुमान मंदिर देवस्थान येथे हनुमान चालीसा पठण व महाप्रसाद कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाला खासदार मधुकर कुकडे, जिल्हा परीषद अध्यक्ष रमेश डोंगरे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, स्वामी दिनेशानंद पाण्डेय, गोंदिया जिल्हा परीषद अध्यक्षा सीमा मडावी, सभापती मंगला बगमारे, सविता ब्राम्हणकर, विनोद पटोले, सीमा भुरे, राजू कारेमोरे, जेसा मोटवानी, चंद्रशेखर ठवरे, शेषराव गिरीपुंजे, रमेश पारधी, भारत खंडाईत, सरपंच निलेश नाकतोडे आदी उपस्थित होते.
पटोले म्हणाले, भाजपा सरकारने दरवर्षी एक कोटी लोकांना रोजगार देण्याचे म्हटले होते. अजूनही रोजगाराची संधी उपलब्ध झालेली नाही. शेतकºयांच्या दीड पट हमी भाव आजपर्यत दिलेला नाही. कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात पेटून उठले पाहिजेत. कोणत्याही कार्याची सुरवात या मंदिरातील पूजा आटोपून करत असतो. आपण या ठिकाणी जे बोलतो ते कृतीत उतरते असेही पटोले म्हणाले.
खासदार मधुकर कुकडे म्हणाले, राज्य व केंद्र सरकारने शेतकऱ्यांना भिकेला लावले असून, शेतकºयांना सरकारने सरसकट कर्जमाफी करावी, यासाठी देवाने या सरकारला सदबुद्धी द्यावी. कार्यक्रमाच्या सुरवातीला हनुमान मंदिर देवस्थानात पूजा पाठ करून, हनुमान चालिसाचे पठण करण्यात आले. त्यानंतर गायक मनीष सोनी यांनी उपस्थितांची मने जिंकून घेतली. यावेळी भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील चार ते पाच हजार लोक उपस्थित होते. संचालन व आभार प्रदर्शन रामचंद्र राऊत यांनी केले. कार्यक्रमासाठी अशोक चांडक, सुभाष खिलवानी यांच्यासह नाना पटोले मित्र परिवाराने सहकार्य केले.

Web Title: Will continue working to save the farmers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.