नवीन नगरपंचायतींच्या कार्यकक्षा कधी ठरणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2015 01:36 AM2015-11-28T01:36:52+5:302015-11-28T01:36:52+5:30

राज्यात २३९ नगरपरिषदा ंअसून त्यामध्ये नव्याने १०० नगर पंचायती समाविष्ट झालेले आहेत.

Will the jurisdiction of new municipal councils ever be decided? | नवीन नगरपंचायतींच्या कार्यकक्षा कधी ठरणार ?

नवीन नगरपंचायतींच्या कार्यकक्षा कधी ठरणार ?

Next

नगरपंचायत इमारतीचा प्रश्न कायम
भंडारा : राज्यात २३९ नगरपरिषदा ंअसून त्यामध्ये नव्याने १०० नगर पंचायती समाविष्ट झालेले आहेत. या नवनिर्मित नगर पंचायतींच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत सदस्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ३० नोव्हेंबरला होत आहे. मात्र, या नगर पंचायतींच्या कार्यकक्षा अद्याप स्पष्ट ठरलेल्या नाहीत. मुख्यधिकाऱ्यांच्या नियुक्ती झालेली नसल्यामुळे या नवनिर्मित नगर पंचायतींच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
राज्यातील २३९ नगर परिषदांच्या कार्यकक्षा, नगराध्यक्षांचे कर्तव्य आणि मुख्याधिकाऱ्यांचे अधिकार नगरविकास विभागाने स्पष्ट केले आहेत. परंतु, नवनिर्मित १०० नगर पंचायतींची कार्यकक्षा, नगराध्यक्षांचे कर्तव्य याविषयी कुठलिही मार्गदर्शक तत्त्वे अद्यापही नगरविकास विभागाने स्पष्ट केलेले नाहीत. त्यामुळे केवळ नगर परिषद आणि नगर पंचायतींना सारखे अधिकार आहेत, असे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. मात्र याविषयी राज्य शासनाचे कुठलेही स्पष्ट आदेश नाहीत. त्यामुळे सर्व कारभार राज्य शासनाच्या दिशानिर्देशानुसार सुरू राहणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

कर्मचाऱ्यांचे समायोजन केव्हा होणार?
तालुका मुख्यालयी असणाऱ्या ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतींमध्ये करण्यात आले. ग्रामपंचायतमधील कर्मचारी वर्गाचे समायोजन नगरपंचायतींमध्ये बिंदूनामावली व शिक्षणानुसार करण्याचे आश्वासन कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. प्रत्यक्षात कुठलिही कार्यवाही नसल्याने या कर्मचाऱ्यांच्या समायोजनाचा प्रश्न कायम आहे.
नगराध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांना कक्ष नाहीत
नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्याधिकारी, विरोधी पक्षनेते यांना स्वतंत्र कक्ष असावयास पाहिजे. परंतु सध्या अस्तित्वात असणाऱ्या नगरपंचायतींमध्ये अशाप्रकारे कुठलीही सुविधा नाही. या सुविधा निर्मितीसाठी नगरविकास विभागाचे कुठलेही निर्देश नाहीत.
नगराध्यक्ष राहणार पैदल
राज्यात २३९ नगर परिषदांच्या अध्यक्षांना व मुख्याधिकाऱ्यांना शासकीय वाहने आहेत. परंतु नगरपंचायतीच्या अध्यक्षांना शासकीय वाहन मिळणार किंवा नाही. याविषयी कुठल्याही सूचना नाहीत. त्यामुळे नगराध्यक्षांना पायीच नगरांची परिक्रमा करावी लागणार आहे.

Web Title: Will the jurisdiction of new municipal councils ever be decided?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.