राजू कारेमोरेंना मिळणार का भाईजींकडून मंत्रिपदाचा आशीर्वाद? राजकीय चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 10:36 AM2023-07-11T10:36:48+5:302023-07-11T10:39:55+5:30

कार्यकर्ते बांधताहेत अंदाज

Will mla Raju Karemore get ministerial blessing from Bhaiji? | राजू कारेमोरेंना मिळणार का भाईजींकडून मंत्रिपदाचा आशीर्वाद? राजकीय चर्चेला उधाण

राजू कारेमोरेंना मिळणार का भाईजींकडून मंत्रिपदाचा आशीर्वाद? राजकीय चर्चेला उधाण

googlenewsNext

राजू बांते

मोहाडी (भंडारा) : राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार यांना साथ देत खासदार प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांची साथ सोडली. त्यांचा गट आता राज्यातील सत्तेतही सामील झाला आहे. पटेलांचे अनुयायी असलेले तुमसर-मोहाडी क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे हेदेखील अजित पवार-पटेल यांच्यासोबत गेल्याने आता कारेमोरेंना भाईजींकडून मंत्रीपदाचा आशीर्वाद मिळेल काय? असा प्रश्न कार्यकर्ते विचारत आहेत.

केंद्रीय राजकारणात प्रफुल्ल पटेल यांचा प्रभाव आहे. राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर ते आणखीच चर्चेत आले. राष्ट्रवादी पक्षाला खिंडार फोडून तीन डझनच्या वर आमदार घेऊन ते भाजपच्या साथीला गेले. त्यांच्या सरकारमध्ये सामील होऊन अपल्या आमदारांसाठी नऊ मंत्रिपदे मिळवून घेतली. आता प्रफुल्ल पटेल केंद्रात मंत्री बनतील आणि आमदार राजू कारेमोरे राज्यात मंत्री होताना दिसतील, असे स्वप्न कार्यकर्ते रंगवित आहेत.

भंडाऱ्याला मिळणार का मंत्रिपद?

आजपर्यंत तुमसर विधानसभा क्षेत्रात मंत्रिपद मिळाले नाही. मतदार संघाच्या पुनर्रचनेपूर्वी मोहाडी-भंडारा विधानसभा क्षेत्र होते. त्यावेळी २००४च्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये ते शेवटचे सहा महिने शिक्षण राज्यमंत्री होते. तत्पूर्वी बंडूभाऊ सावरबांधे यांना अन्न पुरवठा व औषधी उत्पादन शुल्क राज्यमंत्री पद मिळाले होते. तसेच विलास श्रुंगारपवार यांनाही राज्यमंत्रिपद बहाल करण्यात आले होते. विधानसभा निवडणूक लागण्यास एक वर्ष शिल्लक असताना भंडारा जिल्ह्यास मंत्रिपदाची लॉटरी लागते. त्यामुळे पुढील मंत्रिमंडळ विस्तारात राज्यमंत्रिपदाची माळ प्रफुल्ल पटेल यांचे निकटस्थ आमदार कारेमोरेंच्या गळ्यात पडते की शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या, हे काही दिवसांतच बघायला मिळणार.

Web Title: Will mla Raju Karemore get ministerial blessing from Bhaiji?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.