कास्ट्राईबच्या समस्या लवकरच सोडविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 01:12 AM2019-08-04T01:12:48+5:302019-08-04T01:13:30+5:30
जिल्ह्याच्या व कर्मचाऱ्यांच्या समस्या लवकरच निकाली काढण्यात येतील, असे आश्वासन राज्याचे राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी दिले. यावेळी संघटनेच्या वतीने पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांना विविध विषयावर निवेदन देण्यात येवून चर्चा करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्याच्या व कर्मचाऱ्यांच्या समस्या लवकरच निकाली काढण्यात येतील, असे आश्वासन राज्याचे राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी दिले.
यावेळी संघटनेच्या वतीने पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांना विविध विषयावर निवेदन देण्यात येवून चर्चा करण्यात आली. महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ पुणे जिल्हा शाखा भंडारा यांचे कार्यालय जिल्हा परिषद परिसर भंडारा येथे पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी सदिच्छा भेट दिली. त्यांचेसोबत आमदार संजय पुराम उपस्थित होते. यावेळी संघटनेचे राज्याध्यक्ष अरूण गाडे यांनी डॉ.परिणय फुके यांना पुष्पगुच्छ व शाल देवून स्वागत केले.
यावेळी महाराष्ट्र राज्य पूणे संघटनेचे उपमहासचिव सुर्यभान हुमने, जिल्हाध्यक्ष विनय सुदामे, जिल्हा सचिव हरिश्चंद्र धांडेकर, डॉ. मधुकर रंगारी, डॉ.विनोद भोयर, उपाध्यक्ष सिध्दार्थ भोवते तसेच संघटनेच्या इतर पदाधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात, नोव्हेंबर २००५ नंतर शासनसेवेत नियुक्त झालेल्या कर्मचाºयांना जुनी पेंशन योजना लागू करण्यात यावी, कंत्राटी कर्मचाºयांना नियमित करण्यात यावे, जिल्ह्यातील रिक्त पदांवर स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे, भूविकास बँकेतील कर्मचाºयांचा थकीत वेतन व इतर थकीत भत्ते त्वरित अदा करणे, भंडारा जिल्ह्यातील वर्दळीच्या चौकात ट्राफीक सिग्नल लावण्यात यावे, नदीचे पाणी दुषित झाले असून शूध्द पाणी पुरवठा करण्यात यावा याकरिता अद्यावत जलशुध्दीकरण यंत्र बसविणे, सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे मागासवर्गीयांना पदोन्नती देण्यात यावी, समान काम समान वेतन देण्यात यावे, राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत आरोग्य सेविका, सहाय्यीका यांच्या नविन वेतनाप्रमाणे असलेली तफावत दूर करण्यात यावी, तसेच गत दहा ते बारा वर्षांपासून कार्यरत असून त्यांना रिक्त पदावर विना शर्त सामावून घेण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश होता.
याप्रसंगी संघटनेचे विधी सल्लागार अॅड. बी. जी. दामले, सहसचिव यशवंत उईके,मुन्ना ठाकूर, विनोद बन्सोड, अविनाश टांगले, अजय रामटेके, हंसराज बडोले, ओमप्रकाश उके, ओमप्रकाश शामकुवर, शामराव हाडके, रुपेश हुमने, वन कामगार संघटनेचे युवरज रामटेके, एसटी संघटनेचे विजय नंदागवळी, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे अध्यक्ष घरडे, अचल दामले, हरिकिशन अंबादे, जयेव धांडे, मुकेश साकुरे, रुपल भोंगाडे, राज काटेकर, वर्षा रामटेके, कविता चोपकर, वैशाली जगणे यांच्यासह विविध संघाटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.