लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या निराधारांचे पैसे बंद होणार काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 13:11 IST2025-01-28T13:10:29+5:302025-01-28T13:11:20+5:30

Bhandara : जिल्ह्यात २.५० लाखांच्या वर लाडकी बहिण योजनेचे लाभार्थी आहेत.

Will the money of the niradhar beneficiaries of the Ladki Bhahin scheme be stopped? | लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या निराधारांचे पैसे बंद होणार काय?

Will the money of the niradhar beneficiaries of the Ladki Bhahin scheme be stopped?

लोकमत न्यूज नेटवर्क 
भंडारा :
संजय गांधी निराधार योजनेंतर्गत लाभ मिळणाऱ्या अनेक महिलांनी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या लाभासाठी अर्ज सादर केला होता. अनेक महिलांना या योजनेचा लाभ मिळण्यासही सुरुवात झाली. मात्र, ज्या महिलांना निराधार योजनेतून अनुदान मिळत असेल, अशा महिलांना केवळ एकाच योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती आहे.


निराधार व्यक्ती, अंध, दिव्यांग, अनाथ मुले, गंभीर आजार, घटस्फोट किंवा दुर्लक्षित महिला, अत्याचारग्रस्त महिला, तृतीयपंथी आदींना संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत दिली जाते. संजय गांधी निराधार अनुदान योजनेमधील लाभार्थी ६५ वर्षाचे झाल्यानंतर त्या लाभार्थीना श्रावणबाळ योजना, राज्य निवृत्तिवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजनेत सामावून घेतले जाते.


जिल्ह्यात अनेक महिला या योजनेच्या लाभार्थी आहेत. त्यांना नियमित अनुदान मिळत नसल्याने अडचणींचा सामना करावा लागतो. शासनाने या महिलांना नियमित अनुदान देणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून अनेक महिला वंचित आहेत. २.५० लाखांच्या वर लाडकी बहिण योजनेचे लाभार्थी आहेत. सदर महिलांना केव्हा लाभ मिळणार, याची प्रतीक्षा आहे. आपल्या बैंक खात्यात पैसे केव्हा जमा होतील, याची त्या वाट बघत असतात.


फेब्रुवारीपासून अनुदान होणार बंद 
दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांचे अनुदान बंद होणार आहे. यासाठी प्रशासनाने कागदपत्रांची छाननी सुरू केली असल्याची माहिती आहे.


आधार, बँक पासबूक जमा करण्याची प्रक्रिया सुरु 
संजय गांधी निराधार योजनेचा लाभघेणाऱ्या महिलांकडून आधार कार्ड, बँक पासबुक महसूल विभागाकडे जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. 


काही दिवसांत ही प्रकिया पूर्ण होणार आहे. 
ज्या महिला दोन्ही योजनांचा लाभ घेत आहेत अशा महिलांची पडताळणी केली जाणार आहे.


कागदपत्रे जमा न केल्यास अनुदान होणार बंद 
ज्या निराधार महिलांनी महसूल विभागाकडे कागदपत्रे जमा केली नाहीत तर त्यांना पुढे मिळणारे अनुदान बंद होणार आहे. विशेष म्हणजे, यातून छाननी केली जाणार आहे. त्यामुळे ज्यांनी बोगस लाभार्थी आहेत किंवा दोन्ही योजनांचा लाभ घेत आहेत. त्यांना आता अडचणी भेळसावणार असून, त्यांचे अनुदान बंद होणार आहे.


२४ जानेवारीपासून लाभमिळण्यास सुरुवात 
लाडकी बहीण योजनेंतर्गत जानेवारी महिन्याचे पैसे महिलांच्या बँक खात्यात दि. २४ जानेवारीपासून जमा होण्यास प्रारंभ झाला आहे

Web Title: Will the money of the niradhar beneficiaries of the Ladki Bhahin scheme be stopped?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.