नवीन गावठाणात भूखंड मिळणार काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:06 AM2021-03-04T05:06:15+5:302021-03-04T05:06:15+5:30

भंडारा : गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत पिंडकेपार येथील जुन्या गावठाणातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना नवीन गावठाण बेला येथे भूखंड देण्यात येणार होते, मात्र ...

Will there be a plot in the new village? | नवीन गावठाणात भूखंड मिळणार काय?

नवीन गावठाणात भूखंड मिळणार काय?

Next

भंडारा : गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत पिंडकेपार येथील जुन्या गावठाणातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना नवीन गावठाण बेला येथे भूखंड देण्यात येणार होते, मात्र अजूनपर्यंत या प्रकल्पग्रस्तांना भूखंड न मिळाल्याने आमची मागणी पूर्ण होणार काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांना प्रकल्पग्रस्तांनी स्वाक्षरीनिशी दिले आहे.

माहितीनुसार, भंडारा तालुक्यातील पिंडकेपार येथील गोसेखुर्द प्रकल्पामध्ये बाधित शेतकरी यांची घरे व शेतजमिनी शासनाने प्रकल्पासाठी संपादित केल्य आहेत. यात १४० पैकी ९६ लाभार्थींना २०१५ मध्ये भूखंड व शेतजमिनीचा मोबदला दिला आहे.

तसेच शेतकऱ्यांना घरे व शेतजमिनीचा मोबदला नवीन गावठाण बेला येथे घेण्यात आला, परंतु गावठाणातील अन्य शेतकरी काही कामानिमित्त बाहेरगावी गेल्याने नवीन गावठाण बेला येथे भूखंड देण्यात आले नाही. त्यांना दुकानदारापासून वंचित ठेवण्यात आले. यादीतील सर्व शेतकरी हे जन्मापासूनच मौदा पिंडकेपार येथील वास्तव्यात आहेत. त्यांचे वारसदार आजही पिंडकेपार येथील रहिवासी असून, मालमत्तेवरील कराचा भरणासुद्धा ग्रामपंचायत प्रशासनाला करीत आहेत. परिणामी नोकरीनिमित्ताने बाहेरगावी गेले असल्यास त्यांचा मूळ गावातील संबंध तुटतो काय, असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.

मात्र प्रशासनाने ही बाब गृहीत धरली नाही. परिणामी ही खेदजनक बाब असल्याचेही प्रकल्पग्रस्तांनी म्हटले आहे. निवेदनात स्वाक्षरी केलेल्या सर्वच लाभार्थींचे पिंडकेपार येथील राशन कार्डावर नाव आहे.

मग प्रशासनाला वंचित कुटुंबांना बेला येथील नवीन गावठाणात भूखंड देण्यात काय अडचण आहे, हे न उलगडणारे कोडे आहे. राजकीय अंतर्गत गटबाजीमुळे ग्रामसेवक व तलाठी यांनी हेतुपुरस्पर लाभार्थींना वगळले असावे, असा सवालही उपस्थित केला. संबंधित लाभार्थींना नवीन गावठाण बेला येथे भूखंड देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर बाळकृष्ण बंजारी, देवराव साठवणे, हिरामण दिवटे, बळीराम साठवणे, विजय मडावी, सेवकराम साठवणे, सुनील साठवणे, दिलीप साठवणे, सिंधूताई साकुरे, हरिदास बंजारी, मधू साठवणे, रूपचंद साठवणे, कुंडलिक वंजारी, श्रावण साठवणे, त्रिशुला रामटेके आदींच्या सह्या आहेत.

बॉक्स

गणेशपूर ते पिंडकेपारपर्यंत रस्त्याने पथदिव्यांची सोय नाही. पावसाळ्यात पुलावरून पाणी वाहत असल्याने नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो.

Web Title: Will there be a plot in the new village?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.