त्या" शेतकऱ्यांना मुदतवाढ मिळणार का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:31 AM2021-04-03T04:31:52+5:302021-04-03T04:31:52+5:30
मुख्यमंत्र्याकडे केली आहे. तुमसर तालुका हा प्रमुख धान उत्पादक तालुका आहे. मागील वर्षी अतिवृष्टी व पुरामुळे धान पिकाचे मोठे ...
मुख्यमंत्र्याकडे केली आहे.
तुमसर तालुका हा प्रमुख धान उत्पादक तालुका आहे. मागील वर्षी अतिवृष्टी व पुरामुळे धान पिकाचे मोठे नुकसान झाले ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला. भाजीपाला लागवड करणारे शेतकरी यांची स्थिती वाईट आहे. शेतकऱ्यांनी आपले धान शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर विक्री केले. परंतु अनेक शेतकऱ्यांना अजून पर्यंत धानाचे चुकारे मिळाले नाही. तसेच धानाला बोनस सुद्धा मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांकडे पैसा नाही.
शेतकऱ्यांनी विविध पीक लागवडीकरिता कर्ज घेतले होते कर्ज फेडण्याची मुदत ३१ मार्च पर्यंत होतील परंतु शेतकऱ्यांकडे पैसे नसल्याने शेतकऱ्यांनी मुदतीत कर्जफेड केली नाही त्यामुळे त्यांच्यावर आता पुन्हा आर्थिक भुर्दंड बसणार आहे. शासनाने कर्ज फेड न करणाऱ्या शेतकऱ्यांना 30 जून पर्यंत कर्जफे डीची मुदत वाढ देण्यात यावी अशी मागणी आहे.