जिल्हा विकासासाठी ‘टिम भंडारा’ म्हणून काम करु

By admin | Published: April 2, 2017 12:23 AM2017-04-02T00:23:21+5:302017-04-02T00:23:21+5:30

शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजना व कार्यक्रम प्राधान्याने राबविण्यासाठी तसेच जिल्ह्यातील सामान्य माणसाचा विकास व्हावा यासाठी टिम भंडारा म्हणून काम करु या, ...

Will work as Tim Bhandara for district development | जिल्हा विकासासाठी ‘टिम भंडारा’ म्हणून काम करु

जिल्हा विकासासाठी ‘टिम भंडारा’ म्हणून काम करु

Next

जिल्हाधिकारी सुहास दिवसे : डॉ. अभिजीत चौधरी यांना निरोप, नवीन जिल्हाधिकारी रुजू
भंडारा : शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजना व कार्यक्रम प्राधान्याने राबविण्यासाठी तसेच जिल्ह्यातील सामान्य माणसाचा विकास व्हावा यासाठी टिम भंडारा म्हणून काम करु या, असे प्रतिपादन नवनियुक्त जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केले. मावळते जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी प्रशासक म्हणून उत्तम काम केले असून त्यांचे नाविण्यपूर्ण उपक्रम या पुढेही सुरु राहतील, अशी ग्वाही सुहास दिवसे यांनी दिली. सुहास दिवसे यांनी आज जिल्हाधिकारी भंडारा म्हणून कार्यभार स्विकारला.
डॉ. अभिजीत चौधरी यांना निरोप व सुहास दिवसे यांच्या स्वागताचा कार्यक्रम महसूल कर्मचारी यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद कक्षात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रदीप डांगे, निवासी उपजिल्हाधिकारी अशोक लटारे जिल्हा पोलीस अधीक्षक विनीता साहू, मुख्य कार्यकारी अधिकारी शरद अहिरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर उपस्थित होते. यावेळी सुहास दिवसे म्हणाले की, विदर्भात काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे. मात्र वैदर्भिय माणसं प्रेमळ असल्याचा आपला अनुभव असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी हा जिल्ह्याचा प्रमुख असला तरी आपण सर्वांच्या सहकार्याने व सर्वांना सोबत घेवून भंडारा जिल्हयाच्या विकासाला गती देणार असल्याचे त्यांनी सांगितले. निरोपाला उत्तर देतांना डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले की, भंडारा जिल्ह्यात जिल्हाधिकारी म्हणून पहिलीच पदस्थापना असली तरी जिल्ह्याच्या विकासासाठी व शासनाच्या महत्वाकांक्षी योजना सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी सर्व विभागातील अधिकाऱ्यांनी मोलाची साथ दिली. डॉ. चौधरी यांनी आपल्या प्रशासकीय कौशल्याने आपल्या कामाची छाप जिल्ह्यावर सोडली असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक विनीता साहू यांनी सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी शरद अहिरे म्हणाले की, जिल्हा परिषदेला त्यांचे नेहमी सहकार्य लाभले. शिक्षण, आरोग्य व महिला सक्षमीकरण यासाठी डॉ. चौधरी यांनी जिल्हा परिषदेला मार्गदर्शन व सूचना तसेच मदत केली आहे. नवोदय विद्यालयासाठी जागा, महसूल कर्मचाऱ्यांची कालबध्द पदोन्नती, झुडपी जंगल, वन पट्टे, शंभर टक्के वसुली, वैनगंगेवरील जुन्या पुलावरील वाहतुकीस बंदी, शंभर टक्के वसुली, गोसेखुर्द पुनर्वसन सुविधा, कर्मचाऱ्यांसाठी वाचनालय, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आदि कामे अभिजीत चौधरी यांनी यशस्वीपणे केल्याचे महसूल अधिकाऱ्यांनी आपल्या भाषणात सांगितले. उपविभागीय अधिकारी पृथ्वीराज बी.पी. उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, तहसिलदार वरुणकुमार सहारे, धनंजय देशमुख, महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष किशोर राऊत यांची यावेळी भाषणे झाली. कार्यक्रमाचे संचालन अभिषेक नामदेव यांनी केले तर उपस्थितांचे आभार नायब तहसीलदार विनोद थोरवे यांनी मानले. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Will work as Tim Bhandara for district development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.