भिजलेले धान वाळविण्याचा शेतकऱ्यांचा केविलवाणा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 10:32 PM2018-12-19T22:32:13+5:302018-12-19T22:32:52+5:30

येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्डात पावसाने भिजलेले सुमारे तीन हजार धान पोते वाळविण्याचा केविलवाणा प्रयत्न शेतकरी करीत आहे.

Willing efforts of farmers to dry the soils | भिजलेले धान वाळविण्याचा शेतकऱ्यांचा केविलवाणा प्रयत्न

भिजलेले धान वाळविण्याचा शेतकऱ्यांचा केविलवाणा प्रयत्न

Next
ठळक मुद्देतुमसर येथील प्रकार : शेडचे निर्माण केव्हा होणार?

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्डात पावसाने भिजलेले सुमारे तीन हजार धान पोते वाळविण्याचा केविलवाणा प्रयत्न शेतकरी करीत आहे.
विदर्भ तथा राज्यात तांदळाची मोठी बाजारपेठ म्हणून तुमसर कृषी उत्पन्न बाजार समिती प्रसिध्द आहे. परंतु दरवर्षी अवकाळी पावसाचा कहर येथे होतो. धानाची आवक प्रचंड मोठी आहे. त्यामानाने शेड येथे उपलब्ध नाहीत. दरवर्षी हजारो धान पोती शेडअभावी उघड्यावर पडून राहतात. शेतकरी तथा वापाऱ्यांचे येथे मोठे नुकसान होते. कोट्यावधीचा नफा बाजार समिती प्राप्त करते. किमान धान बचावाकरिता शेड निर्मिती करण्याची गरज आहे.
बुधवारी अवकाळी पावसाने उसंत दिली. उन्ह तापू लागले. त्यामुळे शेतकरी व व्यापाºयांची भिजलेले धान उन्हात वाळू घातल्याचे दृष्य येथे दिसत होते. एवढ्या मोठ्या बाजार समितीत धान वाळू घालण्याचा केविलवाणा प्रकार येथे दिसत होता.
प्रचंड मोठा परिसर, परिसरात अवाढव्य बांधकामे, प्रशस्त कार्यालय बाजार समिती संचालकाचे मासीक सभेचे प्रशस्त हॉल येथे तयार करण्यात आले आहे. परंतु शेतकरी अथवा व्यापाऱ्यांचे धान सुरक्षिततेकरिता किमान शेडचे बांधकाम करण्याची तसदी येथे अजूनपर्यंत घेण्यात आली नाही.
येथे गरजू बांधकामावर जरी लाखोचां खर्च करण्यात येत असतांनी शासकीय नियंत्रणात सदर बाजार समितत्या आहेत. त्याबद्दल जाब विचारण्याची तसदी सहकारी खाते घेतांनी दिसत नाही. शेतकऱ्यांची बाजार समिती ओळखली जाते. येथे शेतकऱ्यांचे उत्पादीत माल आभाळाखाली सर्रास ठेवला जात आहे. बाजार समिती प्रशासनाने प्राथमिक सोयीसुविधा पूरविण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे.

Web Title: Willing efforts of farmers to dry the soils

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.