वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 09:55 PM2018-06-02T21:55:09+5:302018-06-02T21:55:29+5:30
शनिवारला पहाटेच्या सुमारास तालुक्यात अनेक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. सतत दोन तास बरसलेल्या पावसाने कापनी झालेली धान पिक पाण्याखाली आली आहेत. त्यामुळे धान उत्पादनात घट होणार आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : शनिवारला पहाटेच्या सुमारास तालुक्यात अनेक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. सतत दोन तास बरसलेल्या पावसाने कापनी झालेली धान पिक पाण्याखाली आली आहेत. त्यामुळे धान उत्पादनात घट होणार आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे.
जून ते सप्टेंबर असे चार महिने मुक्काम ठोकणाºया पावसाने जुन महिण्याच्या पहिल्याच दिवशी आपली हुकुमत गाजवली आहे. दुपारी दोन वाजतापासून ढगाळ वातावरणाने मांडव धरला. रात्री १० वाजता दरम्यान दमट हवामानाने तालुका वासिय बेजार होत असतानाच सर्वत्र काळवंडून आले. दोनच्या सुमारास पावसाच्या जोरदार सरी बरसण्यास सुरुवात झाली. थोड्या-थोड्या वेळाने बरसणाºया या सरींनी तालुकावासीयांना झोडपून काढले. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटाने नागरिकांना धडकी भरविली.
वादळी वाºयासह चौफेर बसरलेल्या पावसामुळे कित्येक घरांचे छप्पर उडाले तर मोठी झाडे पडल्याने घरांच्या नुुकसानीसह विजेचे तार तुटले. तालुक्यातील विहीरगाव येथे मार्तंड ढोरे यांच्या अंगणातील झाड पडल्याने शेजारी राहत असलेल्या सुनिल ढोरे यांच्या दोन गायी झाडाखाली सापडल्या.ही बाब वेळीच लक्षात आल्याने लगेच झाडाची कापणी करून गायींना सुखरूप बाहेर काढले. खैरीपट, मोहरना परीसरातील मोठी झाडे विजेच्या तारावर पडल्याने या परीसरातील वीज पुरवठा बंद पडला आहे.
विजेचा लपंडाव
पावसाने नागरिकांना घरांमध्ये कैद केले असताना महावितरणनेही विजेच्या लपंडावाद्वारे त्यांना शॉक दिला. तालुक्याच्या बहुतांश भागात बत्ती गुल झाली. तालुक्यातील काही परिसरात रात्री दोन वाजताच्या सुमारास वीज पुरवठा खंडीत झाला. पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे पडल्याने महावितरण विभागाच्या कर्मचाºयांना मोठा त्रास सहन करावा लागला, पडलेली झाडे बाजुला करून विजेचा बिघाड काढल्यानंतर शनिवारला दुपारी २ वाजता सुमारास वीज पुरवठा पूर्ववत सुरू झाला.