रुग्णालय आवारात दारुच्या बाटल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 11:27 PM2018-02-06T23:27:58+5:302018-02-06T23:29:02+5:30
येथील ग्रामीण रूग्णालयाच्या आवारात देशी दारुच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या आहेत.
आॅनलाईन लोकमत
मोहाडी : येथील ग्रामीण रूग्णालयाच्या आवारात देशी दारुच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या आहेत. या दारूच्या रिकाम्या बाटल्या रूग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या की आणखी कोणी आणून टाकल्या याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. तथापि त्या बाटल्या रूग्णालयाच्या परिसरातच का टाकण्यात आले, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मोहाडी ग्रामीण रूग्णालयाचा कारभार या ना त्या कारणावरून चर्चेत राहतो. आता तर या परिसरातच देशी दारुच्या बाटल्या आढळून आल्या आहेत. रूग्णालयाला बदनाम करण्यासाठी हे रिकाम्या बाटल्या ठेवण्याचे कारस्थान आहे की, रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी दारू पिऊन इमारतीच्या मागे टाकल्या का? याची चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
रूग्णालयातील काही कर्मचारी दिवसाही मद्याचा आनंद घेत असल्याचे काही कर्मचाºयांनी सांगितले. यादिशेने वरिष्ठांकडून चौकशी केली जावी, अशी नागरिकांची मागणी आहे. वैद्यकीय खात्यातील अधिकारी दारु सोडण्याचे उपदेश करतात. ‘लोका सांगे ब्रम्हज्ञान, आपण कोरडे पाषाण’ असाच हा प्रकार म्हणाावा लागेल.
देशी दारुच्या बाटल्या कुठून आल्या याची कल्पना आपल्याला नाही. हा परिसर दररोज स्वच्छ केला जातो. परंतु त्याठिकाणी दारूच्या रिकाम्या बाटल्या कशा आल्या याचा शोध घेऊन कारवाई करण्यात येईल.
-डॉ.हंसराज हेडावू, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रूग्णालय मोहाडी.