कन्हाळगावच्या लेकींनी फडकविली विजयी पताका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 09:42 PM2018-09-09T21:42:42+5:302018-09-09T21:43:01+5:30

निरंतर सराव, जिंकण्याची उर्मी, जिद्द अन् तेवढाच पालकांचा प्रोत्साहनाच्या बळावर कान्हळगाव (सिरसोली.) येथील नवप्रभात हायस्कुलच्या लेकींनी सतरा वर्ष वयोगटातील शालेय कबड्डी स्पर्धेत जिल्हा पातळीवर सलग दुसºयांदा विजयाची पताका फडकविली. मुलींच्या विजयाचे कौतूक गावभर केले गेले.

Winner of Kanhalgaon bagged the winner | कन्हाळगावच्या लेकींनी फडकविली विजयी पताका

कन्हाळगावच्या लेकींनी फडकविली विजयी पताका

Next
ठळक मुद्देकबड्डी स्पर्धेत सलग यश : जिद्दीने इतिहास घडविला, गावकऱ्यांकडून कौतूकाचा वर्षाव

राजू बांते।
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : निरंतर सराव, जिंकण्याची उर्मी, जिद्द अन् तेवढाच पालकांचा प्रोत्साहनाच्या बळावर कान्हळगाव (सिरसोली.) येथील नवप्रभात हायस्कुलच्या लेकींनी सतरा वर्ष वयोगटातील शालेय कबड्डी स्पर्धेत जिल्हा पातळीवर सलग दुसºयांदा विजयाची पताका फडकविली. मुलींच्या विजयाचे कौतूक गावभर केले गेले.
आदर्श मंडळाच्या वारसाने मिळालेला कबड्डी खेळाचा उत्साह आजही टिकवला जात आहे. स्वर्गीय वामनराव ठवकर यांच्या मृत्यूनंतर आदर्श क्रीडा मंडळाचे अस्तित्वच संपले आहे. तथापि, कबड्डी खेळाचा वारसा नव्या पिढीने जपून ठेवला आहे. वर्षभर प्रतिकुल परिस्थितीतही खेळाचा सातत्य, सराव अन् प्रशिक्षणाच्या माध्यमातून कान्हळगाव येथील मुलींच्या कबड्डीची चमू घडत आहे. त्याचाच परिणाम म्हणून शिवाजी स्टेडीयम भंडारा येथे जिल्हा स्तरावर खेळल्या गेलेल्या शालेय कबड्डी स्पर्धेत नवप्रभात हायस्कुल कान्हळगावचा दणदणीत विजय झाला. नवप्रभातच्या १७ वर्षीय मुलींच्या चमूने अंतिम सामन्यात प्रकाश हायस्कुल कारधा या संघाचा पराभव केला. मोहाडी तालुक्यातील शहरातील शाळांना मात देत ग्रामीण भागात कबड्डी खेळात कान्हळगाव मुलींच्या संघाने आपले अस्तित्व निर्माण केले आहे. दुसºयांदा मिळालेल्या यशाचे कौतूक मुलींना खेळासाठी बळ मिळत आहे.
या मुलींच्या जिद्दीची कहाणी जगावेगळी आहे. सकाळ व सायंकाळी प्राथमिक शाळेच्या क्रीडांगणावर सराव हा नित्याचा भाग झाला आहे. तिनही ऋतूत कबड्डी खेळाचा सराव या मुली करतात. वर्षभरात केवळ दिवाळीच्या मोसमात आनंद घेण्यासाठी खेळाला सुटी देतात. पाऊस, थंडीच्या सरावात आड येत नाही. वर्षभर वेगवेगळ्या संकटांचा सामना करीत या मुली मागील दोन वर्षापासून तयार झाल्या. मागील वर्षी विभागीय कबड्डी स्पर्धेत अंतिम सामन्यात या संघाला एका गुणाने राज्यस्तरावर जाता आले नाही. तरीही त्या सर्व मुलींनी निराश न होता जिद्दीने पुन्हा सरावासाठी उभ्या राहिल्या आहेत. त्याच भरवशावर या मुलींचा संघ जिल्हा पातळीवर अव्वल ठरला आहे. मोठ्या फरकाने विजय मिळवित मैदान गाजविला. आता चंद्रपूर येथे १८ सप्टेंबर रोजी होणाºया विभागीय स्तरावर खेळल्या जाणाºया स्पर्धेत कान्हळगावचा संघ सहभागी होणार आहे. १७ वर्ष वयोगटाच्या जिल्हास्तराचे नेतृत्व कर्णधार निकीता ठवकर करणार आहे. या संघात पूजा निंबार्ते, वैष्णवी पापडकर, काजल निमकर, सेजल सार्वे, पौर्णिमा शेंडे, पायल लिल्हारे, सानिका तिजारे, कीर्ती किटे, आचल निमकर, प्रतिक्षा कुथे या मुलींचा समावेश आहे. कबड्डी सामना बघण्यासाठी क्रीडा संकुल भंडारा येथे लेकींचे वडील, भाऊ, नातेवाईक, तरुण वर्ग उपस्थित होता. या मुलींना कबड्डीच्या प्रवाहात आणण्यासाठी गणेश ठवकर व राष्ट्रीय चॅम्पीयन राकेश ठवकर तसेच राकेश वहिले, राजू उपरकर यांचा मोलाचा वाटा आहे. कबड्डी स्पर्धेत विभागीय पातळीवर सलग दुसºयांदा झेप घेणाºया मुलींचे कौतूक मुख्याध्यापक मार्तंड कापगते, क्रीडा शिक्षक वेदांत साखरे, राजकुमार लिंगायत, देवेंद्र कोकुडे, वृंदा बांते, प्रतीक्षा बंसोडे, रोहिणी फेंडर, मुकेश वहिले, बाळू मारबते तसेच प्रकाश लिल्हारे, देवदास पापडकर, राजू धांडे, विजय शेंडे, जितेंद्र तांडेकर, मधू चवळे, नितेश झंझाड, रणजित शेंडे आदींनी केले.

Web Title: Winner of Kanhalgaon bagged the winner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.