दारूसह २.२५ लाखांचा मुद्देमाल पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 10:40 PM2017-09-15T22:40:58+5:302017-09-15T22:41:21+5:30
विरली ते मासळ रस्त्यावर गस्तीदरम्यान लाखांदूर पोलिसांनी अवैध देशी दारु वाहतूक करणारी व्हॅन व देशी दारू असा एकूण सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करून एका आरोपीला अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : विरली ते मासळ रस्त्यावर गस्तीदरम्यान लाखांदूर पोलिसांनी अवैध देशी दारु वाहतूक करणारी व्हॅन व देशी दारू असा एकूण सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करून एका आरोपीला अटक केली.
नरेश शंकर गभणे रा.धामणी ता. पवनी असे आरोपीचे नाव आहे. मासळ परिसरातून मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या दारूची वाहतूक होत असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे लाखांदूर पोलिसांनी सापळा रचला. यात व्हॅन क्रमांक एम एच ३१ सी आर ९५५७ मध्ये खुलेआम देशी दारूच्या पाच पेट्या घेऊन विरली ते मासळ रस्त्यवर पकडण्यात आले. नरेश गभणे रा. धामणी याचे ताब्यातून जप्त करुन अटक केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक विनिता शाहू यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक मंडलवार, पोलीस नायक मुंजमकर, मांदाडे, कठाणे, शिपाई रोकडे यांनी पार पाडली.
करचखेडा येथे कारवाई
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाºयांनी गोपनीय माहितीच्या आधारावरुन करचखेडा येथे धाड घालून चार टण मोहफुलाचा साठा जप्त केला. जप्त केलेल्या एकूण साहित्यांची किंमत एक लक्ष सहा हजार ४५० रुपये सांगण्यात येते. या कारवाईत दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई गुरुवारी करण्यात आली. या कारवाईत उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त उषा वर्मा व अधिक्षक सुरेंद्र मनपिया यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक एस. एच. मेहकरकर, अरविंद कोटांगले, मंगेश ढेगे, सविता गिरीपुंजे यांनी केली.