दोन वर्षातच किटाळी -मांगली रस्त्यावर पडले खड्डेच खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:26 AM2020-12-27T04:26:20+5:302020-12-27T04:26:20+5:30
किटाळी व मांगली परिसरातील लोकांना तालुक्याच्या ठिकाणी दररोज विविध कामांसाठी या रस्त्याने ये-जा करावी लागते. तसेच या परिसरातील विद्यार्थ्यांना ...
किटाळी व मांगली परिसरातील लोकांना तालुक्याच्या ठिकाणी दररोज विविध कामांसाठी या रस्त्याने ये-जा करावी लागते. तसेच या परिसरातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आणि रुग्णांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र पोहरा व ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे जावे लागते. परंतु रस्ता इतका खराब आहे की रस्त्यावरुन वाहनच काय तर पायी चालणे सुध्दा जिकरीचे झाले आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून हा रस्ता त्वरीत दुरुस्त करावा अशी मागणी परिसरातील जनतेच्या वतीने विलास वाघाये यांनी केली आहे.
किटाळी -मांगली -पेंढरी या रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असल्याने वाहणचालक व पायी जाणारे यांना हा रस्ता खुपच त्रासदायक ठरत असून अपघात होण्याची दाट शक्यता बळावली आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था या रस्त्याची झाली आहे. संबंधित विभागाने या रस्त्याकडे हेतूपुरस्पर दूर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे या मार्गावरुन मार्गक्रमण करणार्याना शारिरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. परिसरातील नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे .याकडे बांधकाम विभागाने वेळीच लक्ष देऊन या रस्त्याची दुरुस्ती करण्याची गरज आहे. २६ लोक ०१ के