ठरावाशिवाय मुख्याध्यापकांच्या वेतनवाढीचा निर्णय रद्द होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 10:39 PM2018-06-26T22:39:28+5:302018-06-26T22:40:10+5:30
शाळा समितीच्या नियमानुसार खासगी शिक्षण संस्थांची कार्यप्रणाली चालत आलेली आहे. परंतु शिक्षण उपसंचालक, नागपूर यांनी मुख्याध्यापकांची वेतनवाढ संस्थांच्या ठरावाशिवाय करण्याचे पत्र काढल्यामुळे भंडारा जिल्हा संस्था चालक संघटना आणि महाराष्ट्र राज्य संस्थाचालक संघटना यांनी उपशिक्षणाधिकारी सतीश मेंढे यांना निवेदन दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शाळा समितीच्या नियमानुसार खासगी शिक्षण संस्थांची कार्यप्रणाली चालत आलेली आहे. परंतु शिक्षण उपसंचालक, नागपूर यांनी मुख्याध्यापकांची वेतनवाढ संस्थांच्या ठरावाशिवाय करण्याचे पत्र काढल्यामुळे भंडारा जिल्हा संस्था चालक संघटना आणि महाराष्ट्र राज्य संस्थाचालक संघटना यांनी उपशिक्षणाधिकारी सतीश मेंढे यांना निवेदन दिले. यावर सविस्तर चर्चा करून वेळीच मार्ग काढण्याचे या निवेदनात सांगण्यात आले. शिक्षण उपसंचालक सतीश मेंढे यांनी अशा प्रकारचे पत्र तातडीने रद्द करण्याचे आश्वासन संस्थाचालक पदाधिकाऱ्यांना दिले.
याउपरही शैक्षणिक सत्र आज पासून सुरू होऊन नव्या भरती बाबद शासन स्तरावर अजूनही परीक्षांचे आणि पोर्टलचे वारे वाहत आहेत. सरकारद्वारे मराठी शाळा बाबतचे उदासीन धोरण पाहून सामान्य नागरिक आणि विद्यार्थी त्रस्त झाले आहे. खाजगी अनुदानित शाळांना शिक्षक न मिळाल्यामुळे भरतीवर परिणाम होतांना प्रकर्षाने जाणवते. तर दुसरीकडे शासन समायोजन करण्याचे मुद्दे पुढे आणून शिक्षण क्षेत्रात संदिग्धता निर्माण करीत आहेत. २०१२ पासून शिक्षक भरती बंद आहे आणि २००२ पासून शिक्षकेतर कर्मचारी भरती बंद आहे अशा परिस्थितीत तासिका बेल कोण मारणार असाही सवाल विचारला जातो आहे. यावेळी निश्चय दोनाडकर, दिपक दोनाडकर, नरेश मेश्राम, दिगंबर मेश्राम, गौतम हुमणे, दिलीप मेश्राम, उमरावजी डोंगरे, हेमंत बांडेबुचे, आल्हाद भांडारकर, लाखनीकर, अण्णाजी फटे, जयपाल वनवे आदी मोठ्यासंख्येने संस्थाचालक उपस्थित होते.