महिलांनी पकडली दारू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 10:27 PM2017-10-05T22:27:42+5:302017-10-05T22:28:09+5:30

अड्याळहून पाच कि.मी. अंतरावर विरली खंदार या छोट्याशा गावातील चौकात मोठ्या प्रमाणात मोहफुलाची आणि देशी दारूची विक्री सुरू होती.

Woman caught by alcohol | महिलांनी पकडली दारू

महिलांनी पकडली दारू

googlenewsNext
ठळक मुद्देदारूबंदीसाठी विरली येथील महिला सरसावल्या : पोलिसांचा दुर्लक्षितपणा कारणीभूत

लोकमत न्यूज नेटवर्क
अड्याळ : अड्याळहून पाच कि.मी. अंतरावर विरली खंदार या छोट्याशा गावातील चौकात मोठ्या प्रमाणात मोहफुलाची आणि देशी दारूची विक्री सुरू होती. त्यामुळे गावातील महिला एवढे आक्रमक झाले आणि दारू विक्रेत्यांना यापूढे दारू विकणार नाही, असे पत्र त्यांच्याकडून लिहून घेतले.
दारूच्या व्यसनामुळे घरात नेहमी होणाºया भांडणामुळे पाच-सहा महिलांना यापूर्वी जीव गमवावा लागला. गावात यापूर्वी तिनदा दारूबंदी होऊनही पुन्हा दारूविक्री झालीच कशी? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. याला ग्रामस्थ की अड्याळ पोलीस जबाबदार असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. विरली खंदार या गावातील एका महिलेच्या घरी व्यसनाधिन पतीने दारुच्या नशेत पत्नीला बेदम मारले. त्यामुळे संपूर्ण महिला व ग्रामस्थ एकत्र येऊन असा प्रकार गावात पुन्हा कोणत्याही महिलेबाबत होऊ नये, यासाठी गावातील दारुबंदी उपक्रम राबविण्यासाठी सुरूवात केली. येथील महिलांनी तीन दिवसात शेकडो लिटर दारू पकडून अड्याळ पोलीस ठाण्यात जमा केले. गावातील चौकात हा व्यवसाय एवढा फोफावला होता की, त्या ठिकाणी महिला व मुलींचे जाणे येणे सुद्धा कठीण झाले होते. कारण पिणारे व्यसनाधिन लोक एवढ््या बेफाट अपशब्दात बोलायचे की त्यामुळेच तिथून महिला मंडळी येजा करीत नसत. परंतु मुख्य मार्ग एकच असल्यामुळे नाईलाजास्तव जावे लागत राहिले. गावात शांतता राहावी, गावातील दारुबंदी समितीच्या महिला पदाधिकाºयांनी पुढाकार घेतला आहे.
यापूर्वीही दारुबंदीविषयी अड्याळ पोलीस ठाण्यात पत्रव्यवहार केला होता. दोन महिन्यापूर्वी अपघात झाल्यामुळे मी बेडरेस्टवर आहे.
-पदमा मेंढे, सरपंच विरली खंदार,
गावातील दारुबंदीसाठी सरपंच, सदस्य, पोलीस पाटील यांचा सहभाग नव्हता. परंतु ग्रामस्थ व महिला मंडळाचा सहभाग होता.
-रजनी मोडघरे, अध्यक्ष तंटामुक्त गाव समिती विरली खंदार
अड्याळ पोलिसांचे सहकार्य लाभले. परंतु दारुबंदी समितीच्या महिलांना इजा झाली तर दारुबंदीसाठी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात येईल.
-मंदाताई मोटघरे, ग्रामस्थ विरली खंदार

Web Title: Woman caught by alcohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.