ट्रकच्या धडकेत सायकलस्वार महिला जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:24 AM2021-07-10T04:24:39+5:302021-07-10T04:24:39+5:30
पौर्णिमा हरिदास गोरसार (३३), रा.विहीरगाव, ता. मोहाडी असे मृत महिलेचे नाव आहे. ती येथील एका हॉटेलमध्ये कामाला होती. शुक्रवारी ...
पौर्णिमा हरिदास गोरसार (३३), रा.विहीरगाव, ता. मोहाडी असे मृत महिलेचे नाव आहे. ती येथील एका हॉटेलमध्ये कामाला होती. शुक्रवारी ती बाजारात खरेदीसाठी जात असताना श्रीरामनगर भागात युनिक सेंटरजवळ भरधाव ट्रकने (क्र. एम.एच.३६ एफ.१८१४) सायकलस्वार महिलेला धडक दिली. ट्रकच्या चाकासोबत काही अंतर सायकलसह पौर्णिमा फरपटत गेली. त्यातच तिच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने मेंदू बाहेर पडला यात तिचा जागीच मृत्यू झाला. अपघात होताच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. तुमसर पोलिसांनी ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक व्ही. व्ही. गोमलाडू करीत आहेत.
पतीचाही झाला होता अपघाती मृत्यू
पौर्णिमा गोरसर यांचे पती हरिदास यांचेही काही वर्षांपूर्वी अपघाती मृत्यू झाला होता. आता पौर्णिमाचाही अपघातात मृत्यू झाला. त्यामुळे त्यांचा पाच वर्षांचा मुलगा निराधार झाला आहे. पतीच्या निधनानंतर ती तुमसर येथील एका हॉटेलात काम करून चरितार्थ चालवीत होती. विहीरगाव येथे या अपघाताचे वृत्त पाेहपचताच गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.