महिलांनी केली रस्त्यावर रोवणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 11:50 PM2018-07-16T23:50:07+5:302018-07-16T23:50:28+5:30
मोर्चा काढून मागण्या मंजूर करणे किंवा तक्रार करून संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देणे ही नित्याचीच बाब. मात्र जमनापूर येथील महिला पुरूषांनी शांततेचा मार्गाने जाऊन चक्क रस्त्यावरच रोवणी करून आपल्या मागण्या दर्शविल्या. ही घटना साकोलीला लागूनच असलेल्या जमनापूर येथे आज घडली. या आंदोलनाची सर्वत्र चर्चा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : मोर्चा काढून मागण्या मंजूर करणे किंवा तक्रार करून संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देणे ही नित्याचीच बाब. मात्र जमनापूर येथील महिला पुरूषांनी शांततेचा मार्गाने जाऊन चक्क रस्त्यावरच रोवणी करून आपल्या मागण्या दर्शविल्या. ही घटना साकोलीला लागूनच असलेल्या जमनापूर येथे आज घडली. या आंदोलनाची सर्वत्र चर्चा आहे.
साकोलीवरून हाकेच्या अंतरावर असलेल्या जमनापूर येथे स्प्रींगडील हॉटेल ते रीणाईत यांच्यापर्यंत असलेल्या रस्त्यावर जमनापूर ग्राम पंचायतने मातीमिश्रीत मुरूम घालण्यात आले.
रात्रीपासून मुसळधार पाऊस आला आणि रस्त्याचे होताचे नव्हते झाले. त्याच परिसरातील तिडके यांच्या घरी लग्नसमारंभ पार पडले व सामान घेऊन येणारा ट्रक त्यात फसला.
सकाळी मोटारसायकलने जाणारे येणारे घसरून पडले. त्यामुळे वॉर्डातील नागरिकांनी एल्गार पुकारला आणि चक्क रस्त्यावरील चिखलावरच धानाची रोवणी करून आंदोलन केले व या रस्त्यावर टाकलेल्या मुरूमाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
यावेळी बंडू शेंडे, नीताराम भेंडारकर, पुरूषोत्तम मुनेश्वर, रहिमतकर, पारधी, अनिल भेंडारकर, रीनाईत, बनकर, लांजेवार, मिनाक्षी बोपचे, अनिता भेंडारकर, सुवर्णा लांजेवार, रिता उईके, सरीता रीनाईत, मंदा मुनेश्वर, नीलू पारधी, रूपाली ठाकूर, उर्मिला रहिमतकर, यमू दोनोडे, सुधा तिडके उपस्थित होते.
सदर रस्त्यावर मुरूम टाकण्यात आला आहे. रात्रीचा पाऊस आल्यामुळे चिखल झाला असेल याची सुधारणा करू.
-पी.एस. येलने, ग्रामसेवक
सदर रस्त्यावर टाकण्यात आलेल्या मुरूम हा मातीमिश्रीत असून कामाची चौकशी करावी.
-बंडू शेंडे, नागरिक़