‘महिला’ कुटुंब तथा समाजातील आधारवड

By admin | Published: March 15, 2017 12:24 AM2017-03-15T00:24:08+5:302017-03-15T00:24:08+5:30

स्त्रीच्या हातात खूप मोठी शक्ती आहे. स्त्री कुंटुंब व समाजाची आधारवड आहे. आशा स्वयंसेविका ही सुध्दा एक स्त्री आहे.

'Women' family and community base | ‘महिला’ कुटुंब तथा समाजातील आधारवड

‘महिला’ कुटुंब तथा समाजातील आधारवड

Next

विनायक बुरडे यांचे प्रतिपादन : सर्वोत्कृष्ट आशा, गटप्रवर्तक पारितोषिक मेळावा
भंडारा : स्त्रीच्या हातात खूप मोठी शक्ती आहे. स्त्री कुंटुंब व समाजाची आधारवड आहे. आशा स्वयंसेविका ही सुध्दा एक स्त्री आहे. त्यामुळेच तीच समाजाची व देशाची खरी सेवा करु शकते, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती विनायक बुरडे यांनी केले. जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट आशा व गटप्रवर्तक पारितोषिक मेळाव्याचे उद्घाटन करताना केले.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, जि.प. भंडारा यांच्या विद्यमाने जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट आशा व गटप्रवर्तक पारितोषिक मेळावा घेण्यात आला. अध्यक्षस्थानी विनायक बुरडे, प्रमुख पाहुणे जि.प. सदस्य निलकंठ कायते होते. प्रमुख उपस्थितीत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रविशेखर धकाते, डॉ. प्रशांत उईके, डॉ. मिलिंद मोटघरे, डॉ. आर. डी. कापगते, डॉ. श्रीकांत आंबेकर, डॉ. विकास मेश्राम, डॉ. वैशाली हिंगे, डॉ. प्रभाकर लेपसे, डॉ. आशिष नाईक, डॉ. मिथुन डोंगरे, डॉ. एस. डी. गांगुर्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
कार्यक्रमास जिल्ह्यातील जवळपास ८०० आशा व गटप्रवर्तक उपस्थित होते. आशा योजनेअंतर्गत जिल्हास्तरावरील प्रथम पुरस्कार सौ. हेमावती गजानन निमजे, प्रा. आ.केंद्र कोंढा पवनी, द्वितीय पुरस्कार दुर्गा कृष्णा भुरे प्रा. आ. केंद्र खमारी ता. भंडार यांना अनुक्रमे ८०००रुपये व ६००० रुपयेचे पुरस्कार तसेच सात तालुक्यातील सात आशांना प्रथम पुरस्कार म्हणून ४००० रुपये व सात आशांना द्वितीय पुरस्कार म्हणून २५०० रुपये तसेच सव्र ३३ प्रा.आ. केंद्रातून प्रथम येणाऱ्या जिल्हातील ३३ आशांन प्रथम पुरस्कार म्हणून १००० रुपये देण्यात आले. पुरस्कार प्राप्त सर्व आशाना पीएफएमएसद्वारे पुरस्कार राशी, प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देवून गौरविण्यात आले. तसेच ज्या प्रा.आ.केंद्रातील आशांनी उत्कृष्ठ काम केले आहे, त्यांना नाविण्यपुर्ण कार्याअंतर्गत प्रथम पुरस्कार मिना उमेश त्रीपात्रे प्रा. आ. केदं्र आसगाव व मालता बंसोड प्रा.आ.केंद्र आंधळगाव यांना प्रत्येकी रु. ३५०० तर द्वितीय पुरस्कार उर्मिला उध्दव कोरे प्रा.आ. केदं्र सरांडी व उषा नरेश ठवरे प्रा.आ.केंद्र खमारी यांना प्रत्येकी २५०० रुपये पीएफएमएसद्वारे पुरस्कार राशी, प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
सर्वोत्कृष्ट गटप्रवर्तक प्रथम पुरस्कार लिलावती नंदनवार प्रा.आ.केंद्र बेटाळा, द्वितीय पुरस्कार रंजुषा बडोले प्रा. आ. केंद्र एकोडी तर तृतीय पुरस्कार कांचन बापुजी मेश्राम प्रा.आ.केंद्र सरांडी यांना अनुक्रमे १०००० रुपये, ६००० रुपये, ४००० रुपये पीएफएमएसद्वारे पुरस्कार राशी, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच प्रा.आ.केंद्र कोंढा व खमारी येथील आशांचा जिल्हास्तरावर प्रथम व द्वितीय क्रमांक आल्यामुळे त्यांचे प्रा.आ. केंद्रातील वैद्यकिय अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांचे शाल, श्रीफळ, प्रशस्तीपत्र व शिल्ड देवून तर त्या प्रा. आ. केंद्रातील गटप्रवर्तक व तालुक्यातील तालुका समुह संघटक यांना प्रशस्तीपत्र व शिल्ड देवून गौरविण्यात आले.
कार्यक्रमात जिल्हास्तरावरुन प्रथम पुरस्कार प्राप्त आशांनी मनोगत व्यक्त केले. तसेच आशांमार्फत स्त्रीभृण हत्या व आरोग्यावर आधारित तसेच महिला सक्षमीकरणावर आधारित नाटीका सादर करण्यात आली. एनसीडी या विभागांतर्गत सर्व आशा व गटप्रवर्तक यांचे शुगर, एचबी,बिपी तपासणी करण्यात आली.
तसेच आरोग्य विभागामार्फत १०८ बाबद व राजीवगांधी जीवनदायीनी योजनेबाबद विविध प्रकारची आयईसी लावण्यात आली होती. तसेच मतदान करण्याबाबतचे जाणीव जागृतीचे बॅनर्स लावण्यात आलेले होते. अध्यक्षीय भाषणात विनायक बुरडे उपाध्यक्ष जि.प. भंडारा यांनी आशांनी ग्रामस्तरावर जास्तीत जास्त रुग्णांना सेवा देवुन जास्तीत जास्त मोबदला मिळवावा तसेच ग्रामस्वच्छता अभियानात भाग घेवून गाव हागणदारीमुक्त करण्यास सहकार्य करावे असे आवाहन केले. प्रास्ताविकामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके यांनी आशा योजना सुरु झाल्यापासून ते आतापर्यंत आशा योजनेत कशा प्रकारे जिल्ह्याने उत्कृष्ठ काम केले, याबाबत माहिती दिली. तसेच जि.प. सदस्य निलकंठ कायते, जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. रविशेखर धकाते, डॉ. वैशाली हिंगे, डॉ. प्रभाकर लेपसे यांनी सुध्दा मार्गदर्शन केले. सुत्र संचालन डॉ. शांतिदास लुंगे यांनी तर पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे संचालन चंद्रकुमार बारई जिल्हा समुहसंघटक (आशा योजना) यांनी केले.
आभार दमयंती कातुरे, राजकुमार लांजेवार, डॉ. भास्कर खेडीकर, संगीता गोंडाणे, अस्मिता खोब्रागडे, नलु पडोळे, मनिष सेलोकर, किशोर अमृतकर, प्रदिप दहिवले, प्रकाश वालमंदरे, सचिन मते, दुर्गेश गरमळे तसेच सर्व तालुका समुह संघटक व गटप्रवर्तक यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)

Web Title: 'Women' family and community base

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.