महिला सरपंचाचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 12:24 AM2017-07-23T00:24:05+5:302017-07-23T00:24:05+5:30

ग्रामपंचायत कार्यालयात बसून शासकीय काम करीत असलेल्या महिला सरपंचाचा विनयभंग करण्यात आला.

Women sarpancham molestation | महिला सरपंचाचा विनयभंग

महिला सरपंचाचा विनयभंग

Next

उमरी येथील घटना : जवाहरनगर पोलिसात गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : ग्रामपंचायत कार्यालयात बसून शासकीय काम करीत असलेल्या महिला सरपंचाचा विनयभंग करण्यात आला. ही घटना भंडारा तालुक्यातील उमरी (फुलमोगरा) येथे घडली.
निशात मारोती रामटेके (२८) असे आरोपीचे नाव आहे. गुरूवारला ही घटना घडली आहे. पीडित महिला सरपंच ही सकाळी ११ वाजताच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयात शासकीय काम करीत होत्या.
यावेळी आरोपी निशांत हा ग्रामपंचायतमध्ये आला त्याने तिथे गोंधळ घातला. त्याला ग्रामपंचायत सरपंच तथा उपस्थितांनी मज्जाव केला. दरम्यान निशांतने पीडित महिला सरपंच यांची ओढणी ओढून मारहाण करीत विनयभंग केला. त्यामुळे उपस्थितांनी सरपंचांना निशांतच्या तावडीतून कसेबसे सोडविले.
याप्रकरणी महिला सरपंचाच्या तक्रारीवरून जवाहरनगर पोलिसांनी निशांतविरूद्ध भादंवि ३५४ (ब), ३२३, १६८ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक आडे करीत आहे.

Web Title: Women sarpancham molestation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.