महिलांनी नवीन पाऊलवाट शोधावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:35 AM2021-03-10T04:35:50+5:302021-03-10T04:35:50+5:30
अनुराधा बुराडे : पवनी : समाजात मुलगा झाला तर आनंद, मुलगी झाली तर नाक मुरडणे. मुलगी सातच्या आत घरात ...
अनुराधा बुराडे :
पवनी : समाजात मुलगा झाला तर आनंद, मुलगी झाली तर नाक मुरडणे. मुलगी सातच्या आत घरात असे अनेक बंधन लादले जातात. ऋग्वेद काळात अशी बंधने नव्हती. त्यांनतर हळूहळू स्त्रियावर बंधने आली. हे बंधन झुगारून नवी पाऊलवाट चोखाळण्याची गरज आहे, असे प्रतिपादन महिला आघाडीच्या शहर अध्यक्ष अनुराधा बुराडे यांनी केले.
जागतिक महिला दिनानिमित्त पवनीत दुर्गा मंदिर प्रांगणात महिला कोरोना योद्धा सत्कार समारंभ पार पडला. समारंभाचे आयोजन भाजप महिला शहर व ग्रामीण संयुक्तिक करण्यात आले होते.
प्रमुख पाहुणे म्हणून भाजप महिला मोर्चा पवनी तालुका अध्यक्ष माधुरी नखाते, महिला पोलीस पुष्पा बोरकर, नगरसेविका पूनम हटवार, माजी जि.प.अध्यक्ष किसना भानारकर, कौशल्या तुमसरे, बचत गट संयोजिका रूपा मेश्राम उपस्थित होत्या.
याप्रसंगी माधुरी नखाते यांनी मार्गदर्शन केले. संचालन वीना चोपकर तर आभार प्रदर्शन कविता कुळमते यांनी केले.
आशा वर्कर्स, आंगणवाडीसेविका, महिला स्वच्छता दूत, बचत गट संयोजिका अशा ज्यांनी कोरूना काळात जिवाची परवा न करता, नागरिकांची सेवा केली. अशा ७१ महिला कोरोना योद्धांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाला माधुरी घाडगे, छाया बावनकर, स्नेहा भोजपुरे, लता तपाडळकर, वृंदा झीलपे, सुरुची टेंभेकर, शालू अवसरे, सुनीता तलवारे, भारती हाडगे, सुरश्री आठले, निशा सोनकुसरे, वनिता हटवार, शोभा मेश्राम, सुनीता पलांदुरकर, रसिका सोमनाथे, नंदा हाडगे, पद्मा पाकमोडे, देवकन्या थेरे, पल्लवी भोयर, गौतमी मंडपे, उषा माळवी, गीता कुर्झेकर, वर्षा जांभूळकर व अनेक कार्यकर्ते उपस्थित होत्या.