भंडाऱ्यातील महिलांना पुरूषांपेक्षा अधिक टेन्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:26 AM2020-12-27T04:26:09+5:302020-12-27T04:26:09+5:30
अती किंवा कमी रक्तदाब निश्पन्न झाल्यावर उपचार करण्यापेक्षा आधीच सजग होणे शहाणपणाचे आहे. दिवसेंदिवस हृदयविकाराचे प्रमाण वाढते आहे. त्याचा ...
अती किंवा कमी रक्तदाब निश्पन्न झाल्यावर उपचार करण्यापेक्षा आधीच सजग होणे शहाणपणाचे आहे. दिवसेंदिवस हृदयविकाराचे प्रमाण वाढते आहे. त्याचा महत्वाचा धोक्याचा घटक अती रक्तदाब होय. रक्तदाब हा आजाराचे केवळ वयस्कर व्यक्तींचा आजार राहिला नसून तरूण पिढीतही रक्तदाबाचे प्रमाण अधिक दिसत आहे. भंडारा जिल्ह्यात महिला आणि पुरूषांची तुलना करता महिलांमध्ये रक्तदाबाचे प्रमाण अधिक दिसून येते. त्यातही सौम्य रक्तदाबाच्या रुग्णांची संख्या जिल्ह्यात अधिक आहे.
बॉक्स
काय काळजी घ्यावी?
रक्तदाब नियंत्रणासाठी नेहमी योगासने, प्राणायम, व्यायाम, मिठाचे प्रमाण कमी करणे, रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधी घेणे गरजेचे आहे. रक्तदाबाची औषधी एकदा सुरू केल्यानंतर ती बंद करता येत नाही. पहाटे फिरायला जाणे, तणावमुक्त जीवन जगण्याचा प्रयत्न करणे, अशी काळजी घ्यावी.
बॉक्स
रक्तदाब वाढण्याचे कारण
अती मानसीक तणाव हे रक्तदाबाचे मुख्य कारण असून आहारात मिठाचे प्रमाण अधिक असणे, वजन वाढणे, स्थुलता आणि व्यायामाचा अभाव होय.
बॉक्स
रक्तदाबाचे प्रमाण (टक्क्यांत)
महिला पुरुष
सौम्य रक्तदाब २१.८ १९.३
गंभीर रक्तदाब १२.२ ११.४
तीव्र रक्तदाब ०४.७ ०४.१
कोट
डॉक्टरचा कोट
तणाव, अनुवंशीकता, जेवनात मीठ जास्त व व्यायामाचा अभाव ही रक्तदाब वाढण्याची मुख्य कारणे आहेत. नियमित तपासणी आणि औषधे घेण्यासोबतच व्यायाम करणे गरजेचे आहे. हेच प्रमुख रक्तदाबावरील प्रमुख औषध आहे.
-डॉ. मनोज चव्हाण, हृदयरोगतज्ज्ञ भंडारा.