रोपवाटिका व्यवसायातून महिला सक्षम होतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 05:09 AM2021-02-28T05:09:03+5:302021-02-28T05:09:03+5:30
नभंडारा : शासनाने महिला बचत गटांसाठी विविध योजना आखल्या आहेत. कोणत्याही योजनेमध्ये महिलांना, महिला बचत गटांना विशेष ...
नभंडारा : शासनाने महिला बचत गटांसाठी विविध योजना आखल्या आहेत. कोणत्याही योजनेमध्ये महिलांना, महिला बचत गटांना विशेष प्राधान्य दिले जाते. त्यामुळे ग्रामीण भागातील महिला सक्षम होतील, असे मत उमेद प्रकल्प व्यवस्थापक मनीषा कुरसंगे यांनी केले.
भंडारा तालुक्यातील धारगाव येथे ओम श्रीराम धान उत्पादक महिला गटातर्फे रोपवाटिका केंद्राच्या उद्घाटन समारंभात त्या बोलत होत्या. यावेळी तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले, कृषी पर्यवेक्षक विजय हुमणे, उमेदच्या तालुका व्यवस्थापक प्रिया सुखदेवे, जिल्हा परिषद सदस्य नीलकंठ कायते, डीएमएम गौरव, डीएमएफआय पाटील, सरपंच संतोष पडोळे, प्रशिक्षक नितीन रामटेके उपस्थित होते. यावेळी मनीषा कुरसंगे यांनी महिलांना शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. अविनाश कोटांगले यांनी शेती व्यवसायातून महिला खऱ्या अर्थाने सक्षम होऊ शकतात. यासाठी अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका, तसेच शेतीपूरक व्यवसायातून कशा पद्धतीने बचत गटांना अधिक विकास साधता येईल, याबाबत मार्गदर्शन केले. प्रिया सुखदेवे यांनी श्रीराम धान उत्पादक महिला गट धारगाव महिलांनी केलेले कार्य व त्यांच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी महिलांची गटातील असलेली एकजूट व त्यांचे कामाचे सादरीकरण, संवाद कौशल्यातूनच खऱ्या अर्थाने बाजार कौशल्य अवगत करून लवकरच ही रोपवाटिका भरभराट येईल, असे सांगितले. कृषी पर्यवेक्षक विजय हुमणे यांनी महिलांना शेती व्यवसायातील बारकावे याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी ओम श्रीराम धान उत्पादक महिला गटातील अध्यक्ष, सचिव, कॅडर, तसेच महिला गटाचे सर्व सदस्य, ग्रामपंचायत सदस्य व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. संचालन प्रिया सुखदेवे यांनी केले.