दारू दुकानांविरूद्ध महिलांचा एल्गार

By admin | Published: June 5, 2017 12:17 AM2017-06-05T00:17:22+5:302017-06-05T00:17:22+5:30

तालुक्यातील खोकरला ग्रामपंचायतीच्या हद्दीत दोन इमारतींचे अनधिकृत बांधकाम सुरू आहे.

Women's Algarr against liquor shops | दारू दुकानांविरूद्ध महिलांचा एल्गार

दारू दुकानांविरूद्ध महिलांचा एल्गार

Next

अनधिकृत बांधकामाला विरोध : खोकरला ग्रामपंचायतीसमोर दोन तास ठिय्या
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : तालुक्यातील खोकरला ग्रामपंचायतीच्या हद्दीत दोन इमारतींचे अनधिकृत बांधकाम सुरू आहे. भविष्यात या इमारतींमध्ये दारूचे दुकान उघडणार असल्याने याला विरोध करून शनिवारी शेकडो महिला ग्रामपंचायतीवर धडकल्या. परंतु, त्यावेळी सरपंच व सचिव गैरहजर असल्याने महिलांनी दोन तास ठिय्या आंदोलन केले. वातावरण तणावपूर्ण बनल्यानंतर विस्तार अधिकारी व पोलिस निरीक्षकांच्या मध्यस्थीने या प्रकरणावर पडदा पडला. दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर महिलांनी आंदोलन मागे घेतले.
सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील दारू दुकाने बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर दारू विक्रेत्यांनी ग्रामीण भागाकडे मोर्चा वळविला आहे. खोकरला येथील गजानन नगरात दोन इमारतींचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम नियमबाह्य असून भविष्यात याठिकाणी दारू दुकाने सुरू होणार आहेत. ग्रामपंचायतचे सरपंच व सचिवांची यात मोठी भूमिका आहे. दरम्यान, याची माहिती महिलांना होताच शनिवारी शेकडो महिलांनी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष भाऊराव बन्सोड यांच्या नेतृत्वात ग्रामपंचायतीवर मोर्चा नेला. त्यावेळी सरपंच, सचिव व उपसरपंच अनुपस्थित असल्याने महिला संतप्त झाल्यात. जोपर्यंत सचिव व सरपंच तसेच प्रशासनाचे अधिकारी चर्चेसाठी येत नाही तोपर्यंत हटणार नाही, अशी भूमिका घेत दोन तास ठिय्या मांडला.
महिला संतप्त झाल्याचे पाहून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी तसेच तंमुसचे अध्यक्ष बन्सोड यांनी सचिव प्रमोद तिडके व सरपंचा नैलिला कोडापे यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क केला. तेव्हा सचिव सुटीवर असल्याचे सांगण्यात आले, तर सरपंचाकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर भंडारा पंचायत समितीच्या खंडविकास अधिकारी यांना त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता, त्यांच्याकडूनही प्रतिसाद मिळाला नाही. सदर प्रकार पाहता समस्यांवर चर्चा करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन व सबंधित विभागाचे प्रशासनाचे अधिकारी यांचे सहकार्य मिळत नसल्याने व दोन तास होऊनही ग्रामपंचायतला कुलूप ठोकून कामकाज बंद पाडण्याच्या तयारी करीत होते.
दरम्यान भंडाऱ्याचे पोलिस निरीक्षक गजानन कंकाळे यांना शिष्टमंडळाने माहिती दिली. दोन तास होऊनही चर्चेसाठी व निवेदन स्वीकारण्यासाठी कुणीही येत नसल्याने ग्रामपंचायतीला कुलूप ठोकण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ग्रामपंचायतचे सदस्य करमचंद वैरागडे व अमृत सार्वे यांनी महिलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, सचिव किंवा सरपंच यांचेशीच चर्चा करू अशी तटस्थ भूमिका घेतली होती. दरम्यान, पोलिस निरीक्षक कंकाळे यांनी महिला शिष्ठमंडळासोबत चर्चा करून सामंजस्याने प्रकरण संपुष्टात आणावे असे सांगितले. त्यानंतर विस्तार अधिकारी बी.के. बोदेले यांनी ग्रामपंचायतीत येऊन सबंधितांचे बांधकाम थांबविण्यात यावे, यासह इतर मागण्याचे निवेदन स्वीकारले. सबंधितांशी पाठपुरावा करून दोषीवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

गजानननगर येथे सुरू असलेल्या बांधकामाची सबंधितांनी ग्रामपंचायतकडून मंजुरी घेतली नाही. तरीसुद्धा इमारतीचे बांधकाम सुरू केले आहे. सदर इमारतीमध्ये बिअर बार सुरू होणार असल्याने याला महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती खोकरला व महिला मंडळाचा विरोध आहे. खोकरला गावामध्ये दारूबंदी करण्यात आली आहे.सरपंच, उपसरपंच व पदाधिकारी यांनी केलेल्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांना आंदोलन करावे लागले.
-भाऊराव बन्सोड, अध्यक्ष तंमुस
सदर बांधकामाची सबंधितांनी ग्रामपंचायतची मंजुरी न घेता बांधकाम सुरू केले. त्यांचेविरूध्द ग्रामपंचायने ठराव घेवून कलम ५२ अंतर्गत कारवाई करावी तसेच त्यासाठी लागणारा सर्व खर्च त्यांच्याकडून वसूल करू.
-बी.के. बोदेले, विस्तार अधिकारी, पं.स. भंडारा.

Web Title: Women's Algarr against liquor shops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.