झरप येथे दारुबंदीसाठी एकवटली महिलाशक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2017 12:17 AM2017-03-15T00:17:29+5:302017-03-15T00:17:29+5:30

नारी शक्ती एकवटली की अशक्य ते शक्य होण्याची किमया नवी नाही.

Women's assimilation for couples | झरप येथे दारुबंदीसाठी एकवटली महिलाशक्ती

झरप येथे दारुबंदीसाठी एकवटली महिलाशक्ती

Next

दारुच्या बाटल्या फोडल्या : धुळवडीच्या दिवशीची घटना
पालांदूर : नारी शक्ती एकवटली की अशक्य ते शक्य होण्याची किमया नवी नाही. याची प्रचिती धुळवडीच्या दिवशी झरप (कोलारी) येथे अनुभवायला मिळाली. सकाळीच गावातील महिलांनी एल्गार पुकारत अवैध दारुविक्री करणाऱ्या दोन गावातीलच इसमांना दारुसह पकडले. यात एकाला पकडण्यात यश आले तर दुसरा फरार होण्यात यशस्वी झाला.
यात ११ पेटी देशी दारु पकडण्यात आली. त्याची किंमत १५, हजार ५० रूपये एवढी असून आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये पालांदूर ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. झरप/कोलारी येथील गावकऱ्यांच्या मते आंध्र प्रदेशातील एका इसमाने दारूचा व्यवसाय थाटला. याला विरोध करण्यासाठी महिला व विद्यार्थिनींनी पुढाकार घेतला. गावकरी दारु जप्तीकरिता सरसावले. यावेळी प्रकाश मटाल यांच्या घरी साठा आढळला तर दुसरा अजय शिवणकर याच्याही घरी अवैध देशी दारु मिळाली. मात्र अण्णाचा पत्ता लागला नाही.
मुख्य सुत्रधार बाहेरच असल्याची खंत गाववासीयांनी व्यक्त केली. सकाळी ११ वाजतादरम्यान पालांदूर पोलीस ठाण्याला सूचना दिली. ठाणेदार मनोज वाढीवे, हवालदार रविकिशोर चोले, सहाय्यक फौजदार गणपत कोल्हे, पोलीस शिपाई रुपचंद वैद्य, विकास रणदिवे, पोलीस वाहन चालक हेमराज मेश्राम यांनी कारवाई केली. पोलीस पाटील, तंटामुक्त समिती व महिला शक्ती एकत्र आल्याने दारूबंदीसाठी हा प्रयत्न यशस्वी ठरला. (वार्ताहर)

Web Title: Women's assimilation for couples

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.